नौदलाचे चीन आणि पाकिस्तानच्या छुप्या मनसुब्यावर बारकाईने लक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |


neavy_1  H x W:


नवी दिल्ली : हिंद महासागरातील चीन आणि पाकिस्तानच्या संशयास्पद कारवायानंतर भारतीय नौदल सतर्क झाले आहे. नौदलाने या प्रदेशात अंडरवॉटर आणि ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली आहे. या क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाचीदेखील मदत घेतली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



हिंद महासागर भागात पाकिस्तानी नौदलाचे पीएनए यार्मुकच्या उपस्थितीची माहिती भारतीय नौदलास मिळाली यानंतर भारतीय नौदल अधिक सतर्क झाले. हे जहाज रेड सी मार्गे रोमानियाहून पाकिस्तानकडे जात आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्याच वेळी
, पूर्व हिंद महासागर प्रदेशात चिनी नेव्ही टाइप Y901 वर्गाच्या टँकरची उपस्थिती आढळली आहे. हा टँकरचा मलक्काच्या सामुद्रधुनीतून प्रवेश होताना भारतीय नौदलाला ट्रॅक झाला तेव्हापासून भारतीय नौदल यावर लक्ष ठेवून आहे.



पी
8 आय ही संशयितावर ठेवलेली पाळत ठेवणारी विमाने ही तैनात, तटरक्षक दल देखील सतर्क



अन्वेषणासाठी पी
8 आय संशयितावर पाळत ठेवणारी विमाने देखील तैनात केली आहेत. त्याच वेळी, तटरक्षक दल देखील सागरी सीमांचे रक्षण करीत आहे. मलेशिया जवळील मलाक्रा सामुद्रधुनीकडून हिंद महासागर क्षेत्रात प्रवेश करणार्‍या सर्व चिनी जहाजांवर भारतीय नौदल सातत्याने देखरेख ठेवते. काही दिवसांपूर्वी, नौदलाच्या शोध विमानाने पी 8 आय हिंदी महासागराच्या प्रदेशात कार्यरत असलेल्या चीनी नौदलाच्या सात युद्धनौका सापडल्या ज्या महासागरात सक्रिय होत्या.



चीन हा वारंवार युक्तिवाद करतो की तो हिंद महासागर प्रदेशातील गस्त घालणाऱ्या युद्धनौका आणि अणु-शक्तीच्या पाणबुड्यांविरूद्ध कारवाई आंतरराष्ट्रीय कृती दलाचा एक भाग आहे. कधीकधी ही जहाजे भारतीय सीमांमध्ये प्रवेश करतात. परंतु तज्ञांच्या मते पाणबुड्या कधीही समुद्री चाच्यांवर कारवाई करत नाहीत. जी चीनचा छुपा मनसुबा प्रतिबिंबित करते.

@@AUTHORINFO_V1@@