कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स समूहाकडून मोठी घोषणा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |

reliance petrol _1 &


‘या’ लोकांना देणार मोफत पेट्रोल-डीझेल आणि जेवण...


मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स समूह कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना मोफत पेट्रोल आणि डिझेल देणार आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या शहरांमध्ये मोफत जेवण उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाने केली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रिलायन्स समूह दिवसाला १ लाख मास्क तयार करत आहे.


रिलायन्स उद्योग समूहाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, 'सीएसआर (कंपनी सामाजिक जबाबदारी) युनिटद्वारे चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १०० बेडची व्यवस्था केली आहे. तसंच, काम थांबले असेल तर कायम आणि कंत्राटी कामगारांना पूर्ण वेतन देण्यात येईल. कंपनी कोरोनाबाधित रूग्णांना घेऊन जाणाऱ्या आपत्कालीन वाहनांना मोफेत इंधन पुरवठा करणार आहे. त्याचबरोबर, कोरोनामुळे ज्यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे त्यांना रिलायन्स फाउंडेशनतर्फे मोफत जेवण दिले जाणार आहे.'


भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. तसंच, रुग्णालय, दुकान आणि दूरसंचारसारख्या कंपनीत कमीत-कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क आणि जामनगरमधील रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्येही काळजी घेतली जात असल्याचे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@