पुण्यात कोरोना चाचणीचे पहिले कीट तयार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |

corona kit_1  H
पुणे : कोरोना विषाणूचा विळख्यात संपूर्ण जग सापडले आहे. जगभरामध्ये कोरोनामुळे लाखो मृत्यू गेले आहेत. भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अचूक निदान करणारे भारतातील पहिले कीट विकसित करण्यात आल्याचा दावा पुण्यातील एका कंपनीने केला होता. आता या कीटला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डी.सी.जी.आय) सोमवारी मान्यता दिली आहे. यामुळे कोरोना निदानासाठी देशामध्ये दररोज दहा हजार जणांची चाचणी शक्य आहे. असा दावा मायलॅब डिस्कवरी सॉल्यूशन या पुण्यातील कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे हे कीट अवघ्या सहा आठवड्यांमध्ये तयार केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अद्याप अधिकृतरीत्या याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
 
 
 
देशभरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या निदानासाठी किट असणे अत्यावश्यक आहे. हे किट आतापर्यंत केंद्र सरकारद्वारे देशातील ५२ प्रयोगशाळांना देण्यात येते. मात्र नुकतेच हे किट भारतीय कंपनीने पुण्यात विकसित केले आहे. त्याच्या गुणवत्तेची आणि अचूक रोगनिदानाची काटेकोर तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थाने केली आहे. त्यानंतर डीसीजीआयने त्याला मान्यता दिली. आतापर्यंत हे कीट केंद्र सरकार आयात करुन प्रयोगशाळांना देत होते. मात्र आता हे किट पुण्यातील एका कंपनीने विकसित केलं आहे. या किटची गुणवत्ता आणि अचूक रोगनिधनाची काटेकोर तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केली आहे. हे देशातील पहिलं किट असल्याचा दावा केला जात आहे. हे किट विकसित करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@