धक्कादायक ! कोरोनानंतर चीनमध्ये हंता विषाणूचा फैलाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |

china_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला चीनपासून सुरुवात झाली आणि संपूर्ण जगामध्ये मृत्यूचा वणवा पेटला. यानंतर आता कुठे चीन यापासून सावरत असताना हंता नावाच्या नव्या विषाणूची लागण होऊन एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यासोबत बसने प्रवास करणाऱ्या इतर ३२ जणांचीही चाचणी करण्यात आली. चीनमधील सरकारी वृत्तपत्राने ही माहिती दिल्यानंतर संपूर्ण जगभरामध्ये याची चर्चा सुरु झाली आहे.
 
 
चिनी राज्य वृत्तपत्र ग्लोबार टाईम्सने ही माहिती दिल्यानंतर सोशल मीडियात ही माहिती मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे आधीच कोरोनाने भीती निर्माण झालेल्या नागरिकांच्या मनात हंता व्हायरसने खळबळ उडाली आहे. नवीन विषाणूच्या भीतीमुळे लोक महामारी होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक प्रयत्नांविषयी बोलत आहेत. बरेच वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की जर लोक चीनमध्ये जनावरे खाणे बंद करीत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारचे व्हायरस मानवी जीवनासाठी नेहमीच धोकादायक ठरू शकतात.
 
काय आहे हंता व्हायरस?
 
हंता व्हायरस कोरोना व्हायरससारखा घातक नाही. तज्ञांचा असा विश्वास आहे की हा व्हायरस कोरोनासारखा हवेत पसरत नाही. तसेच श्वासाद्वारे या व्हायरसची लागत होत नाही. उंदीर किंवा गिलहरीच्या संपर्कात येणाऱ्या मानवाला हा व्हायरस होत असल्याचं बोलले जात आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, उंदरांना हंता विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. जर एक निरोगी व्यक्ती देखील हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर संसर्ग होण्याचा धोका असतो. हंता व्हायरस कोरोना सारखा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. जर एखाद्या व्यक्तीने उंदरांच्या विष्ठा, मूत्र इत्यादींना स्पर्श केल्यानंतर डोळे, नाक आणि तोंड स्पर्श केला तर या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीस ताप, डोकेदुखी, शरीरावर वेदना, पोटदुखी, उलट्या, अतिसार होऊ शकतो. जेव्हा अशा लक्षणांसह संक्रमित व्यक्तीस उपचारांमध्ये उशीर होतो तेव्हा फुफ्फुसात पाणी भरले जाते ज्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो.
 
हंता व्हायरस खरोखर प्राणघातक आहे?
 
हंता विषाणू प्राणघातक आहे. सीडीसीच्या मते, त्यामध्ये संक्रमित 38 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. चीनमध्ये हंता विषाणूचे हे प्रकरण अशा वेळी उघडकीस आले आहे जेव्हा कोरोना विषाणू आधीच संपूर्ण जगात त्याचा उद्रेक करीत आहे. संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वीच कोरोनाला जागतिक साथीचा रोग जाहीर केला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे १६ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. जगभरात ३ लाख ८२ हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार १९६ देशांमध्ये झाला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@