नाशिकमध्ये झाकीर हुसेन हॉस्पिटल कोरोनांसाठी राखीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |
bhujbal_1  H x
 
 

25 मार्चच्या सकाळपासून नाशिक जिल्ह्याच्या सीमा बंद करणार !

 
 

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी नाशिक मनपाचे झाकीर हुसेन हॉस्पिटल पूर्णत: राखीव ठेवण्यात येत असुन यात केवळ कोरोना बाधीतांना सेवा सुश्रृषा देण्यात येतील. तसेच खबरदारीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून नाशिक जिल्ह्याच्या सर्व सिमा 25 मार्च 2020 च्या सकाळपासून सिल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांनी पत्रकारांना दिली.
 
आज कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विविध शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीनंतर उपस्थित पत्रकारांशी पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, वासंती माळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक डॉ.मनोहर अनचुडे हे उपस्थित होते. पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीचे मुद्दे
 
 कुठल्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी करतांना जनता व नागरिक गुन्हेगार नाहीत याची जाणीव ठेऊन वागणूक द्यावी.
 राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू.
 जिल्ह्यात सर्वत्र 144 ची अंमलबजावणी.
 सर्व प्रकारच्या कायदेशीर कारवाईला सर्व यंत्रणांना मुभा देण्यात येत आहे. परंतु या कारवाईला मानवी चेहरा असावा.
 जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा नियमित आढावा घेऊन उपाययोजनांबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत.
 लोकांनी 'जनता कर्फ्युला' उत्स्फुर्त प्रतिसाद दिला परंतू अजुनही गर्दी टाळली पाहिजे.
 लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घाबरुन न जाता यात आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.
 25 मार्च 2020 च्या सकाळी 6 वाजेपासून जिल्ह्याच्या सिमा बंद राहतील. जिल्ह्यात येण्यास व जिल्ह्यातून बाहेर जाण्यास पूर्णत: मज्जाव असेल.
 अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही वाहने अन्य कामांसाठी फिरणार नाहीत.
 ऑटो रिक्षामध्ये 1 वाहनचालक + 1 प्रवासी = 2 इतक्या लोकांना प्रवास करता येणार.
 अत्यावश्यक सेवा वगळता कारण नसतांना शहरात फिरणाऱ्या वाहने व लोकांवर पोलीस कारवाई करणार.
 पेट्रोल पंपावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दुचाकी वाहनाला रुपये 100/- व चारचाकी वाहनाला रुपये 1000/- चे इंधन देणार.
 जादा इंधन घेणाऱ्यांवर लक्ष ठेवणार व कारवाई करणार.
 भाजीपाला विक्रीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा निश्चित करुन देणार. एकाच ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेणार.
 फिरत्या वाहनांमधून अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला प्राधान्य देणार.
 बाजार समित्यांमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लिलाव व विक्रीची सुविधा करण्याचे आदेश.
 शेतकरी स्वत: बाजार समितीच्या बाहेर माल विकत असेल तर त्यास गर्दी टाळण्याच्या अटीवर मान्यता.
 जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या 500 क्वारंटाइन रुग्ण
 आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांची भिती नाही. जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्त जिल्हयातून येणाऱ्या संशयतीवर प्रशासनाची करडी नजर.
 प्रशासनाची नजर चुकवुन काही आंतरराष्ट्रीय प्रवासी शहरात असतील त्यांचा शोध घेणार त्यांना खाजगी रित्या/सरकारी क्वारंटाइनच्या सूचना देणार.
 अन्नधान्य पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधांसाठी सुरु असलेल्या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना सेवा देण्यास मुभा.
 कुठल्याही प्रकारच्या मांस विक्रीवर बंदी घातलेली नाही.
 टप्प्या टप्प्याने जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी बसणाऱ्यांना विशिष्ट काळासाठी परवानगी देणार.
 बचतगटाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे कापडी मास्क बनविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु आहे.
 सर्व प्रकारची औषधे, व्हेटींलायझर्स यांच्या उपलब्धतेवर मोठ्या प्रमाणावर भर.
 जिल्ह्यात नाशिक मनपाकडे 6 तर जिल्ह्यात सरकारी व खाजगी मिळून एकूण 146 व्हेटींलायझर्स आहेत.
 घरी राहुन काम करण्यावर भर देण्यात यावा.
 काही कुटूंबांमध्ये सदस्य संख्या जास्त असल्यामुळे त्यांना खुप वेळ घरात राहता येणार नाही. याची जाणीव ठेऊन त्यांना विखुरलेले ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना.
 सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळावर कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची काळजी घ्या.
 शासन सर्व काही जनतेसाठी करते आहे जनता आणि प्रशासन यांच्या समन्वयाने काम करण्यावर भर देणार.
 प्रशासनाच्या समन्वयाला न जुमानणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी.
 जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी अत्यंत चांगले काम करत आहेत. जनतेनेही त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे.
 आज लागू केलेली संचारबंदी ही अल्पकाळासाठी असावी असे वाटत असेल तर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा, गर्दी टाळा.
 जेथे काळा बाजार होत असेल, गर्दी होत असेल त्याची सूचना तात्काळ प्रशासनाला हेल्पलाईन क्रमांक 104 वर अथवा 100 वर करावी.
 ज्या पाश्चिमात्य देशांमध्ये या रोगाची लागण झाली आहे व लोक मृत्युमुखी पडता आहेत त्या देशात लोकांवर अत्यंत कडक निर्बंध लादले असुन आपल्यावर ती वेळ येणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी.
 स्वयंस्फुर्तीने बंद पाळणाऱ्यांचे स्वागत.
@@AUTHORINFO_V1@@