संचारबंदीतही नमाजपठण, मशिदीच्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |

muslim_1  H x W
 
 
 
 
 

कायदा मोडणाऱ्यांवर पोलीसांकडून कारवाई

मुंबई : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जिथे जगभरातून प्रयत्न केले जात आहेत, त्याच वेळेस काही समाजातील लोकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत कलम १४४ लागू केले असतानाही मशिदीत नमाजपठणासाठी बाहेर पडलेल्या लोकांमुळे मंदीर ट्रस्टीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे.जे. पोलीस ठाण्यात सुन्नी शाफी मशिदीच्या ट्रस्टींवर दीडशे जणांना मशिदीत एकत्र बोलावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
महाराष्ट्रात जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागातील लोकांनी अद्यापही संचारबंदीला गांभीर्याने घेतलेले नाही. भिवंडीतील आसबीबी मशिदीतही सोमवारी अजान झाली. लोक नमाज पठणासाठी इथे एकत्र आले. यानंतर भिवंडी पोलीसांनीही या प्रकरणी मशिदीतील ट्रस्टींवर कारवाई केली आहे. पोलीसांनी केवळ अजान सुरू ठेवत लोकांना नमाज पठण घरून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, काही लोकांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, पोलीसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई सूरू केली आहे.
 
 
भायखळा येथे सुरू असलेल्या सीएए विरोधातील आंदोलन पोलीसांनी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले हे आंदोलन संचारबंदी आणि कलम १४४ मुळे मागे घेण्याचे निर्देश पोलीसांनी दिले आहेत. दरम्यान, घराबाहेर पडणाऱ्याला पोलीसांनी आपला खाक्या दाखवण्यास सुरूवात केली आहे.


 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@