देशात २३ रुग्ण ‘कोरोना’मुक्त; पण घ्यावी लागणार ‘ही’ काळजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2020
Total Views |

corona recovery_1 &n
 
 
मुंबई : कोरोना विषाणूंच्या विळख्यामध्ये संपूर्ण जग अडकले आहे. अद्यापही कोरोनावर त्वरित उपचार होण्यासारखी लस उपलब्ध झाली नसली तरीही बर्याच कोरोनाग्रस्त रुग्णावरील उपचार हे त्यातून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरत आहेत. देशामध्ये आत्तापर्यंत ३२४ रुंग आढळेले आहेत. तरीही भारतामध्ये तब्बल २३ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. त्यांना सरकारने घरामध्येच राहून इम्यूनिटी वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
 
 
जगभरामध्ये तब्बल ९० हजारांवर रुग्ण बरे झाले असल्याची माहिती डब्ल्यु एच ओ ने दिली आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३ लाखांवर आहे. कोरोनामुळे जगभरामध्ये १४ हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने किमान ९० हजार लोकांना कोरोनापासून वाचविण्यात यश आले आहे.
 
 
कशी घ्याल काळजी?
 
 
> शिंकताना तोंडावर रुमाल घेणे, सॅनिटायझर वापरणे, घरी आल्यावर हात स्वच्छ धुणे आणि रोगप्रतिकारक शक्ती जपणे एवढी काळजी घ्यावी.
 
> वृध्द व कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना थोडी काळजी घ्यायला हवी.
 
> ज्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी फार गर्दीच्या ठिकाणी जावू नये.
 
> कायम मास्क लावून ठेवावा आणि अगदीच गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना विषाणूची चाचणी करून घ्यावी.
 
> ज्या चुका इटली सारख्या देशाने केल्या आहेत त्या आपण करू नये. जसे देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केले असताना अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये
 
> कलम १४४ लागू केलेय राज्यांमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@