लॉकडाऊन न पाळण्याबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : कोरोनासारख्या विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. परंतु, याच गांभीर्य जनतेमध्ये दिसत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळाले. कोरोना सारख्या संसर्गजन्या विषाणूचा सामना करण्यासाठी जनतेने काहीदिवस घरत थांबण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी केले होते. मात्र. तरीही जनतेला त्याचे गांभीर्य नाही का? असा सवाल पंतप्रधानांनी केला आहे. तसेच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की, “लॉकडाऊनला अजूनही अनेकजण गांभीर्याने घेत नाही आहेत. स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका, आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे. तसेच, देशातल्या सर्व राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत.”
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यू ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रविवारीच दिला. तरीही मुंबईतल्या रस्त्यांवर खासगी वाहनांमधून येणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढलेली दिसून आली. लोक काही अत्यावश्यक काम असल्याशिवायही बाहेर पडल्याचे चित्र होते. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही असे चित्र दिसून आले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@