कोरोना संकटावर मात करण्यासाठी आनंद महिंद्रांचा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2020
Total Views |


anand mahindra_1 &nb


मुंबई : म​हिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी करोना संकटामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून, महिंद्रा हॉलीडेसचे रिसॉर्ट्स देण्यासह स्वतःचे १०० टक्के वेतनही मदत म्हणून देणार आणि करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असल्याचे ट्विटरवरुन जाहीर केले.






यापूर्वी महिंद्रा यांनी रविवारी एकापाठोपाठ पाच ट्विट करुन
, “तज्ज्ञांनुसार भारत करोना संकटाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलाय किंवा तिसऱ्या टप्प्याच्या अगदी दारात उभा आहे त्यामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे, काही आठवडे लॉकडाउन हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरील दबावही थोडा कमी होईल. पण, आपल्याला अजून बरीच तात्पुरती रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे आमच्या उत्पादन सुविधांद्वारे व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी काय करावे लागेल यावर महिंद्रा ग्रुप तातडीने काम सुरु करेल.आम्ही तात्पुरती काळजी सुविधा केंद्र म्हणून आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स देण्यासही तयार आहोत.आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन व सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे. तसेच आम्ही करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असून, त्यात मी माझे १०० टक्के वेतन मदत म्हणून देईल, तसेच आम्ही आमच्या सहयोगींनाही या निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करूअसे जाहीर केले आहे.त्यांच्या या आवाहनांनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून तसेच सोशलमिडीयातून कौतुकाची थाप पडत आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@