कोरोनावर आता भारत काढणार उपाय ! सरकारकडून १४००० करोडची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2020
Total Views |

medicine_1  H x
 
 
 
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने भारतावर खूप मोठी नामुष्की ओढावली आहे. संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणू पसरला असून नाहक बळी जात आहेत. विशेष म्हणजे चीनसह बर्याच देशांनी कोरोनावर लस शोधली असल्याचा दावा केला असला तरी अद्याप कोरोनावर कुठलीही विशिष्ट लस उपलब्ध नाही. याच धर्तीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोरोनावर उपाय शोधून मोठ्या प्रमाणामध्ये औषधे तयार करण्यासाठी १४ हजार कोटींची तरदूत केली आहे. यामुळे सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय)ला उत्पादन वाढविणे सोपे जाणार आहे. तसेच, चीनमधून होणारी आयातदेखील यामुळे थांबवता येईल. 
 
 
पहिल्या योजनेंतर्गत सरकारने एक हजार कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध करुन दिले असून यामुळे राज्यांना मोठ्या प्रमाणात औषधे पुरविण्यात मदत होईल. देशातील वैद्यकीय उपकरण उद्यानांना राज्यांच्या सहकार्याने प्रोत्साहित केले जाईल. यासाठी प्रत्येक उद्यानासाठी अनुदान म्हणून जास्तीत जास्त १०० कोटी रुपये राज्यांना देण्यात येणार आहेत. वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी कंपन्यांना ३,४२० कोटी रुपयांचे बजेटही ठरवले आहे. सर्व ५३ एपीआयची घरगुती उत्पादनासाठी यादी तयार केली आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@