देशभरातील रेल्वे सेवा ३१ मार्चपर्यंत बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2020
Total Views |
Railway_1  H x
 
 
 

मुंबई लोकलही मध्यरात्रीपासून होणार बंद


मुंबई : देशभरातील संपूर्ण रेल्वे सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणाारी लोकलही सोमवार दि. २३ मार्च रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय असून कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.
 
 
 
सरकारतर्फे वारंवार आवाहन करूनही नागरिक वारंवार रेल्वे प्रवास करत होते. शनिवारी दिवसभरात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून १५ होम कोरोंटाईल शिक्के असणाऱ्या रुग्णांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच होम कोरोंटाईल करण्यात आलेले रुग्ण वारंवार निर्देश दिल्यानंतरही सार्वजनिक वाहनांनी प्रवेश करत होते. या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ही ७४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत हा आकडा दहाने वाढला आहे. हीच चिंतेची बाब लक्षात घेऊन सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पुढील सूचना येईपर्यंत घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@