‘जनता कर्फ्यू’ : पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2020
Total Views |
modi_1  H x W:



पंतप्रधानांच्या आवाहनाला जनतेचा उदंड प्रतिसाद
मुंबई : कोरोना व्हायरस ग्रस्तांचा आकडा भारतात दिवसेंदिवस वाढत चालला असून संपूर्ण भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. या मोहिमेला संपूर्ण भारतवासियांनी भरघोस प्रतिसाद देत संध्याकाळी ५ वाजता टाळ्या, थाळ्यांच्या आवाजात घंटानाद केला. जनतेने केलेल्या हा सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी संपूर्ण देशवासियांचे आभार मानले. ‘हा एक धन्यवादाचा नाद आहे’, असे मोदींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.


आज देशभरात सर्वांनी संध्याकाळी ५ वाजता आपल्या घराच्या गॅलरीत, दरवाज्याजवळ, खिडकीत येऊन घंटानाद केला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारावून गेले. त्यांनी संपू्र्ण देशवासियांच्या ट्विटच्या माध्यमातून आभार मानले. 'हा केवळ एक नाद नसून ही एका मोठ्या लढाईतील विजयाची सुरुवात आहे' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता या मोठ्या लढाईसाठी तयार व्हा आणि स्वत:वर काही बंधने घाला असे आवाहन मोदींनी या ट्विटमधून केले आहे.





भारतात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा ३४१ वर गेल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली ही आहे. ही खूप धक्कादायक बातमी असून अन्य देशांप्रमाणे आता भारतातील स्थिती देखील चिंताजनक बनत चालल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@