शाहीनबागेत कोरोनाचा एक संशयित : तरीही आंदोलन राहणार सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2020
Total Views |
ShahinBaugh_1  
 
 
 

आंदोलक, बहीण आणि आईला झाला कोरोना 

नवी दिल्ली : शाहीनबागेतील शेरनी म्हणवून घेणाऱ्या आंदोलकांकडून एक निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित संशयित या ठिकाणी असल्याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतरही इथून हटवण्यासाठी आंदोलक तयार झालेले नाहीत. या प्रकारामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. आंदोलनकर्त्याची बहीण दुबईहून आली असून ती कोरोनाग्रस्त आहे.
 
 
 
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शाहीनबागेत गेले कित्येक दिवस आंदोलन सुरूच आहे. संबंधित रुग्णाचा भाऊ या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याच्याद्वारे कोरोनाचा फैलाव या ठिकाणी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, तरीही आंदोलन मागे न घेण्याची भूमीका इथल्या प्रमुख प्रवक्त्यांनी घेतली आहे. रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी आंदोलकांचा उत्साह काहीसा मावळला आहे. मात्र, रात्री नऊ वाजल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे समजते आहे.
 
 
 
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या भावाने दिलेल्या प्रतिक्रीयेत तो म्हणाला, "माझी बहीण मार्च महिन्यात सौदी अरब येथून परतली आहे. तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ती आल्यानंतर १० मार्च रोजी मी आणि माझी आई तिला भेटण्यासाठी गेलो होतो." या माहितीनंतर प्रशासनाने दोघांनाही एहतियादन दिल्ली गेट येथे विलगीकरण कक्षात ठेवले आहे. दरम्यान कोरोना चाचणी केल्यानंतर दोघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
 
 
हा धक्कादायक प्रकार कळल्यानंतरही शाहीनबागेतील आंदोलकांचे डोळे उघडलेले नाहीत. त्यांनी स्वतःची चाचणी करून घेण्यास नकार दिलाच मात्र, आंदोलनही रात्रीपासून सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाहीनबागेत बाहेरून लोक येतच असून आंदोलन सुरूच आहे, अशी प्रतिक्रीया स्थानिकांनी दिली आहे. या लोकांमुळे आमच्या परिसराचे वस्तीची नाहक बदनामी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@