छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात १७ जवान शहिद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2020
Total Views |
naxal_1  H x W:
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : नक्षलींशी दोन हात करताना १७ जवानांना हुतात्म आले. ही घटना शनिवार, दि. २१ मार्च रोजी घडली असून आता याबद्दल अधिकृत वृत्त देण्यात आले आहे. हे जवान बेपत्ता असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. मात्र, या सर्वांना नक्षलींशी लढताना हौतात्म्य आल्याची माहिती छत्तीसगड सरकारने दिली आहे. या चकमकीत १२ डीआरजी आणि पाच एसटीएफ जवानांचा सामावेश होता. पोलीसांनी शनिवारपासूनच शोधमोहिम सुरू केली होती. तसेच नक्षलींचा छडा लावण्यासाठी एका शोधपथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे.
 
 
चितागुफा येथील जंगलात राहणाऱ्या दीडशे जणांचे पथक या जवानांसाठी शोधमोहिमेवर पाठवण्यात आले होते. शनिवारी उशीरापर्यंत याबद्दल कुठलीही माहिती मिळू शकलेली नव्हती, असे सुकमातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितले. १४ जखमी जवानांना एअरलिफ्ट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरजागुडा पहाडी या भागात शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चकमक झाली. त्यावेळी जवानांचे ‘एरिया डोमिनेशन एक्सरसाइज’ सुरू होते. डीआरजी, कोबरा आणि एसटीएफ यांच्या संयुक्त कामगिरीत बुस्कापाल आणि तिमेलिएदा क्षेत्रात नक्षली लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली.
 
 
नक्षलवाद्यांनी सहाशे सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला. जवानांनी याचा जोरदार प्रतिकार केला. नक्षलींचा मोठा गट इथे जमणार असल्याची माहिती जवानांच्या पथकाला मिळाली होती. नक्षलींचा हा डाव उलथवून लावण्यास जवानांना यश आले आहे. दरम्यान याबद्दल माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफने घटनास्थळाची जबाबदारी घेतली आहे. नव्या रणनितीसह नक्षलींना उखडून काढण्याची तयारी सूरू आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रायपूर येथील रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची विचारपूस केली.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@