सीएएवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने पसरवली ‘कोरोना’ची अफवा : रमाकांत यादव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2020
Total Views |
ramakant yadav_1 &nb





समाजवादी पक्षाच्या नेत्याचे बेताल वक्तव्य; पोलिसांकडून गुन्हा दाखल


दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनामुळे हाहाकार मजला आहे. या विषाणूमुळे जगभरात १००४९ लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. १७९ देश या विषाणूच्या विळख्यात अडकले असून, यावरील उपाययोजना शोधात आहेत. मात्र ‘कोरोना ही भाजपने पसरवलेली अफवा असून, ही अफवा केवळ सीएए आणि एनआरसीवरून लक्ष हटवण्यासाठी पसरवण्यात आली आहे’, असे बेताल वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते, आजमगडचे माजी खासदार रमाकांत यादव यांनी केले आहे.

 
‘जगभरात कोरोना पसरू शकतो, परंतु भारतात नाही. जर कोरोनाबाधित व्यक्ती भारतात असेल तर मी अशा व्यक्तीची गळाभेट घेईन,’ असे ते म्हणाले. डीएम एनपी सिंग यांनी त्यांना त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत, वैज्ञानिक आधार देण्यासाठी नोटीस बजावली आहे. तसेच एका आठवड्यात नोटीसला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

 
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आजमगडचे डीआयजी सुभाषचंद्र दुबे यांच्या आदेशानुसार शनिवारी रमाकांत यादव यांच्याविरूद्ध सिधारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे डीआयजी म्हणाले.


शुक्रवारी सपामध्ये रुजू झालेल्या बलीहारी बाबू यांचे एसपी कार्यालयात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात माध्यमांशी माजी खासदार रमाकांत यादव यांनी कोरोना विषाणूबद्दल त्याने विधान केले.


@@AUTHORINFO_V1@@