टाळ्या वाजवल्याने मजुरांना मदत मिळणार नाही ; राहुल गांधी पुन्हा बरळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2020
Total Views |

rahul gandhi_1  
 
 
नवी दिल्ली : देशामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्व देश हैराण आहे. केंद्र सरकार तसेच सर्व राज्य सरकार कोरोनाच्या या वादळापासून कसे वाचता येईल यासाठी एकत्र निर्णय घेत आहेत. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू करताना डॉक्टर, मीडिया तसेच कोरोना सारख्या भयंकर संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी रविवारी ५ वाजता घराच्या किंवा खिडकीमध्ये येऊन काहीवेळ टाळ्या वाजवण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाला सर्व स्तरांतून स्वागत होत असताना राहुल गांधींनी आक्षेप घेत 'याने देशातील व्यवसायिक आणि मजुरांना मदत मिळणार नाही' या विधानामुळे पुन्हा एकदा राहुल गांधींना ट्रोलर्सचा सामना करावा लागणार आहे.
 
 
 
 
 
 
कोरोनासारख्या भीषण रोगामुळे जगभरामध्ये १५ मोठ्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम पाहायला मिळत आहेत. अशामध्ये राहुल गांधींच्या या विधानावर नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, " आपल्या नाजूक असलेल्या अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूने प्रहार केला आहे. लहान आणि मध्यम व्यवसायिक तसेच मजुरी कामगार हे कोरोनामुळे जास्त प्रभावित झाले आहेत. टाळ्या वाजवल्याने त्यांना मदत मिळणार नाही. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे."
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@