रविवारी रेल्वे 'लॉकडाऊन' ; घराबाहेर न पडण्याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2020
Total Views |

railway_1  H x
 
 
मुंबई : देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशामध्ये कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारने कठोर पाऊले उचलण्यासाठी तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च रोजी रविवारी 'जनताकर्फ्यू'चे आवाहन केले आहे. अशामध्ये आता रेल्वे प्रशासनाने तब्बल ३७०० गाड्या रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
 
 
२१ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २२ तास एकही ट्रेन चालवण्यात येणार नाही. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी ट्रेनसाठी रेल्वेने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ट्रेन आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार २२ मार्च रोजी २२ तासांसाठी कोणतीही ट्रेन आपल्या सुरूवातीच्या स्थानकापासून रवाना होणार नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@