लोकमान्य टिळकांच्या समाजसुधारणेबद्दलच्या भूमिका (भाग ३)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2020
Total Views |


tilak_1  H x W:



स्वराज्याच्या आंदोलनात गावोगावी फिरताना महार, मांग, कोळी, कोष्टी मराठे या सर्व जातींच्या पानसुपार्‍या टिळकांनी घेतल्या आणि त्या त्या जातीच्या लोकांनाही ‘टिळक ब्राह्मणांचे’ त्यांना आपण कसे बोलवावे असे वाटले नाही. समाजसुधारणेच्या बाबतीत कालानुरूप टिळकांच्या भूमिका बदलत गेल्या, सोवळे ओवळे त्यांनी शिथिल केले, चटकन सुधारणा घडून येतील यावर त्यांचा भरवसा नव्हताच. त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांनी त्या सुधारणा स्वतःसुद्धा घडवून आणल्या, असेच म्हणावे लागेल. अस्पृश्याच्या हातून चहा प्यायल्याने प्रायश्चित्त घेणारे टिळक, मुसलमानाच्या हातून चहा पिऊ लागले. सर्वजातीय लोकांत मिसळून भोजन करू लागले. राष्ट्रकार्यासाठी मुसलमानांच्या दर्ग्यातही जायला त्यांना हिंदू धर्म आड आला नाही.



‘वेदोक्त प्रकरण
’ घडून गेले. शाहू छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार मिळाला. छत्रपतींच्या घराण्यात मौंजीबंधन घडून आले. मध्यंतरीच्या काळात पंचगंगेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. १ ९१ ९च्या सुमारास एका दैनिकात याबद्दल टिळक लिहिते झाले, तेव्हा टिळक काय म्हणाले बघा-“वेदोक्ताचे अधिकारही कोल्हापूरच्या राजास देण्यास माझा पाठिंबा होता व ब्राह्मणेतरास देण्यास मी कधीही हरकत घेतली नाही. वेदोक्ताचे अधिकार देणे हा वादाचा विषय नव्हताच. वाद होता तो धर्माभिमानी ब्राह्मण पुरोहितांस व त्यांचे इनाम जप्त करण्याचा धाक घालून जबरदस्तीने त्यांच्या मर्जीविरुद्ध ब्राह्मणेतर कुटुंबातून वेदोक्त कर्म करण्यास भाग पडावे की नाही, या संबंधीचा होता. कोणाच्याही जातीत आपल्या मर्जीप्रमाणे वेदोक्त कर्म करण्यास मार्ग मोकळा आहे हे मी जाणतो.” वेदोक्ताबद्दल याहून स्पष्टता काय हवी.



इतर विविध प्रसंगी टिळकांनी स्वतः सुधारणेबद्दल काय लिहिले ते त्यांच्याच शब्दात बघणे महत्त्वाचे ठरते
. रा. परांजपे यांना फटकावताना एका लेखात ते लिहितात, “रा. परांजप्यांची विशीही उलटलेली नव्हती तेव्हा आम्ही मागासलेल्या व अंत्यजवर्गाच्या उन्नतीसाठी मी खटपट सुरू करून गणपत्युत्सवात त्यांस बरोबरीचा दर्जा मिळवून दिला होता.” नंतरच्या काळात जात, मत व धर्म या तिन्ही उपाधींनी न ग्रासलेले असे राष्ट्रीय सभेचे धोरण असले पाहिजे, असेही टिळक राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून बोलले. जात, मत व धर्म यातील भेदाभेद लक्षात न आणता सर्व माणसे राष्ट्राच्या कार्याकरिता एक होतात, याचे नाव एकी व याचे नाव राष्ट्र, ही टिळकांची राष्ट्राची व्याख्या. यातील ‘मत’ ही गोष्ट बाजूला ठेवली, तर जात आणि धर्माच्या पलीकडचे ‘राष्ट्र’ ही टिळकांची कल्पना पक्की पुरोगामीच वाटते.



२३ मे
, १९१७ रोजी नाशिकच्या भाषणात टिळक म्हणाले होते, “स्त्री शिक्षण, मोफत शिक्षण, मागासलेल्यांचे शिक्षण, सामाजिक सुधारणा वगैरे गोष्टींस आम्ही प्रतिकूल नाही व नव्हतो. पण, स्वराज्यात या सर्व गोष्टी सुसाध्य आहेत म्हणून तो एकच उद्देश पुढे ठेवून ही संस्था उद्योग करत आहे.” राष्ट्रीय शिक्षणाने जातिभेद मोडेल याची त्यांना खात्रीच होती. “राष्ट्रीय शिक्षण ब्राह्मणांकरिताच नको आहे. अंत्यजाला, चांभाराला, सोनाराला सर्वांनाच ते शिक्षण मिळाले पाहिजे,” इतकेच बोलून टिळक थांबत नाहीत, तर पुढे “जातिभेद मोडण्याची आवश्यकता किती आहे, हे आमच्या विद्यार्थ्यांस समजले पाहिजे, जातीजातींचे तंटे न होऊ देण्याची जबाबदारी घेणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.” राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून समाजसुधारणा करावीशी वाटत होती. टिळक आणि त्यांच्या सहकार्‍यांची पिढी एकमेकांशी भांडण्यात गेली. पण, आता येणार्‍या पुढच्या पिढीवर सुरुवातीपासूनच जातिभेद न मानण्याचे संस्कार झाले, तर समाजसुधारणा आणखी सोप्या होतील, हेच टिळकांचे सांगणे!



छत्रपतींच्या नंतर झालेल्या पेशव्यांच्या काळात जातिभेदाने टोक गाठले ही गोष्ट आजही बोलली जाते
. मात्र, समाजसुधारणेच्या बाबतीत पेशवाई आमच्यापेक्षा किती पुढे होती हे टिळकांच्याच शब्दात बघूया. “प्रसिद्ध ब्राह्मणवीर परशुरामभाऊ पटवर्धन यांची कन्या तरुणपणी गतभर्तृका झाली होती. तिचा पुनर्विवाह करून तिला पुनः सनाथ करावे असा त्यांचा बेत होता व त्यास अनुकूल अशी त्यांनी बर्‍याच शास्त्री लोकांची मते गोळा केली होती. सवाई माधवरावांचा विवाह झाला, तेव्हा मराठ्यांना व मुसलमानांना एके ठिकाणी झालेली मेजवानी आणि बालाजी बाजीरावाने देशस्थ कन्येशी केलेला विवाह, या वा अशा अनेक गोष्टींवरून माझा फार पूर्वी झालेला समज म्हणजे पेशव्यांचे राज्य आणखी काळ चालते तर सुधारणेसाठी आम्हाला इतका त्रास पडला नसता. देशस्थिती सुधारण्यासाठी मुळात इतिहासात डोकावून धडे घेण्याची त्यांची तयारी होती. सुधारणा ही प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून सुरू करावी, या मताचे टिळक होते. त्या काळात ब्राह्मणांच्यात भेदाभेद इतका होता की कोकणस्थ, देशस्थ आणि कर्‍हाडे एकमेकांमध्ये लागणे लावत नसत.



ब्राह्मणांनी सुधारणेच्याबाबतीत पुढाकार घ्यावा, असे सांगताना किमान त्यांच्यातील शाखाभेद विसरून एकमेकांची लग्ने लावावीत, असेही टिळक म्हणत. पेशवाईत असे प्रयोग झाल्याचे दाखले देऊन टिळक सुधारणेचा पुरस्कार करत. त्यांच्या समकालीन सुधारकांना टिळक हेच सांगत, ब्राह्मणांनी एकदा का अशी लागणे सुरू केली, तर त्याचे परिणाम इतरांवरही होतील याचा टिळकांना विश्वास होता. आमच्या धर्मात पुष्कळ निरर्थक चालीरीती आहेत हे त्यांनी कधीही अमान्य केले नाही. उलट सर्वांनी मिळून सावकाशीने आणि सर्वानुमते त्यांचे उच्चाटन करायला हवे, याच मताचे टिळक होते. लखनौ करारानंतर टिळकांचे एकही भाषण असे राहिले नसेल ज्यात त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांची युती झाल्याची उल्लेख केला नाही. “हिंदू आणि मुसलमान यांचीदेखील युती झाली आहे, तर मग ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात एकी होऊ शकणार नाही का? राष्ट्राचे आत्यंतिक कल्याण होत असेल तर मी अस्पृश्य वर्गासोबत सर्व व्यवहार करण्यास तयार आहे. हल्लीचे जे कृत्रिम उच्चनीच भाव आहेत ते नष्ट झाले पाहिजेत. कालांतराने ते जाणारच. (६ मार्च २०२०)



ब्राह्मण
-ब्राह्मणेतर दरी कमी करण्यासाठी जागोजागी सामाजिक परिषदा भरवण्यात विठ्ठल रामजी शिंदे पुढाकार घेत होते. टिळकांचे त्यांच्याशी चांगले सूत जमले. मात्र, सुधारणेच्या मुद्द्यावर लेखी सही द्यायला टिळकांनी नकार दिल्याने विठ्ठलराव जरा हिरमुसलेच. अखिल भारतीय परिषदेत टिळक गरजले होते. “साक्षात देवालाही अस्पृश्यता मान्य नाही, तर आम्ही माणसांनी ती का पाळावी? जाती-जातीत जेवणे व स्पर्शास्पर्श मोडून टाकण्यास मी अनुकूल आहे, हे मी अनेकवेळा बोलून दाखवले आहे,” असे सांगून, “त्यासाठी काम करायला मला आता वेळ नाही म्हणून मी सही करण्याचे नाकारले,” असे स्वतःचे समर्थन टिळकांनी केले आहे.


सर्व हिंदूंना प्रवेश मिळेल असे एखादे मंदिर तुम्ही बांधा,” असे टिळकांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना सांगितले होते, “असे मंदिर झाले तर त्या ठिकाणी सर्व हिंदूंशी बोलण्यास मी नक्की येईन,” हेही सांगायला टिळक विसरले नाहीत. स्वराज्याच्या आंदोलनात गावोगावी फिरताना महार, मांग, कोळी, कोष्टी मराठे या सर्व जातींच्या पानसुपार्‍या टिळकांनी घेतल्या आणि त्या त्या जातीच्या लोकांनाही ‘टिळक ब्राह्मणांचे, त्यांना आपण कसे बोलवावे’ असे वाटले नाही. समाजसुधारणेच्या बाबतीत कालानुरूप टिळकांच्या भूमिका बदलत गेल्या, सोवळे-ओवळे त्यांनी शिथिल केले. चटकन सुधारणा घडून येतील यावर त्यांचा भरवसा नव्हताच. त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांनी त्या सुधारणा स्वतःसुद्धा घडवून आणल्या असेच म्हणावे लागेल. अस्पृश्याच्या हातून चहा प्यायल्याने प्रायश्चित्त घेणारे टिळक मुसलमानाच्या हातून चहा पिऊ लागले. सर्वजातीय लोकांमध्ये भोजन करू लागले. सुधारणेसाठी मुसलमानांच्या दर्ग्यातही जायला ते कचरले नाहीत
राजकीय उन्नतीसाठी उच्चवर्णीय पुढार्‍यांना सोबत घेऊन चालणे गरजेचे असले तरीही खाजगी जीवनात टिळक सुधारणावादी वागल्याचे दिसून येईल. स्वतःच्या मुलींना शिकवणे, त्यांच्या लग्नाची मर्यादा इतर सनातनी ब्राह्मणांना रुचणार नाही इतकी वाढवणे, हे त्यांनी करून दाखवले. सीतारामपंत पटवर्धन यांची मुलगी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याचे त्यांना मंडालेच्या तुरुंगात समजले. तेव्हा टिळकांनी पत्रातून तिचे तोंडभरून कौतुक केले होते, हे लक्षात घ्यायला हवे. 



स्वराज्यात समानता कशी नांदेल हे सांगताना टिळक म्हणतात
, “भावी स्वराज्यात ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांना सारखेच हक्क व त्यांचा दर्जा सारखाच राहील, यात शंका नको. ब्राह्मणी स्वराज्य होऊन त्यात ब्राह्मणांचा वरचष्मा राहणार अशी चुकीची कल्पना डोक्यात भरवून देशातील शहाण्यासुरत्या पुढार्‍यांनी ठरवलेल्या योजनेस विरोध करणे योग्य नाही, ही दिशाभूल आहे.” (२३ ऑक्टोबर १९१७) अशा प्रकारची दिशाभूल आजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आमच्या ‘जाणत्या’ नेत्यांकडून सुरू असतेच, हे वेगळे सांगायला नको. टिळक प्रत्यक्ष सुधारणा चळवळ खांद्यावर घेत नाहीत, म्हणून त्यांच्यावर टीका करणार्‍यांना टिळकांनी एक प्रश्न विचारला आहे. तो सवाल असा की, “एखाद्या अमेरिकन मुत्सद्याने ‘युनायटेड स्टेट्स’मधील निग्रो लोकांच्या उद्धाराच्या कार्यात प्रमुखत्वाने पडण्याचे नाकारले म्हणून त्याने केलेले इतर कार्य विसरून जावे काय?” टिळकांचा हा प्रश्न टिळक विरोधकांचे सगळेच प्रश्न निकालात काढणारा आहे!

(लोकमान्य टिळकांच्या समाजसुधारणेबद्दलच्या भूमिका - प्रकरण समाप्त)

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@