कोण कट्टर धर्मांध?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2020
Total Views |


pakistan_1  H x



पाकिस्तान सरकारने
‘धार्मिक विटंबना विरोधी कायदा’ जाहीर करून कट्टरतावादी धर्मगुरू व दहशतवाद्यांच्या हातात अल्पसंख्याक विरोधी जणू हत्यारच दिले आहे. या कायद्याचा आधार घेऊन गरीब व निरूपद्रवी हिंदू, ख्रिश्चन नागरिकांना फाशी देण्यात येत आहे. ‘कुराणचा अनादर केला’ या तथाकथित व खोट्या आरोपावरून फैसलाबादमधील पाच चर्च, २७ ख्रिश्चन कुटुंबे, तीन शाळा, रुग्णालयांना मुस्लीम गुंडांनी आग लावून नेस्तनाबूत केले. तेव्हा, फैसलाबादमधील जीवाच्या आकांताने परागंदा झाले. खंडणीकरिता हिंदूंचे अपहरण करणे व फिरौतीची अपेक्षित रक्कम न मिळाल्यास त्या अपहृत व्यक्तीची हत्या ही पाकिस्तानात नित्याची बाब ठरली आहे.



धर्माच्या नावावर फाळणी होत असताना कायदे आझम महंमद अली जिना यांनी
‘सर्वधर्मसमभावा’ची भलावण केली होती. परंतु, १४ ऑगस्टच्या अमावस्येला पाकिस्तानातील ‘अल्पसंख्याक’ ‘काफर’ झाले आणि प्रेताने भरलेले आगगाडीचे डबे हिंदुस्तानात दाखल झाले. याउलट हिंदुस्तानामधून ज्यांना पाकमध्ये जायचे होते ते सुखैनैव तिकडे जाऊ शकले. १९४७ साली २२ टक्के असलेले हिंदू व शीख, तसेच १२ टक्के असलेल्या ख्रिश्चन समाजाचे हनन होऊन ते २.७ टक्के इतके झाले आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या क्षणी लाखो बंगाली मुस्लीम हिंदुस्तानात आले. बरेचसे इथेच स्थिरावले. आज ‘रोहिंग्यां’चे स्वागत नको. सरकार ही भरलाड थांबणार की नाही? ‘कोणीही यावे, टपली मारुनी जावे’ हे कधी थांबणार? सहनशीलता हा सद्गुण दुर्गुण तर ठरत नाही ना, हे तपासण्याची वेळ आली आहे. सर्व परकीय समाजास सामावून घेणारी आमची हिंदू संस्कृती! आम्हालाच ‘सर्वधर्मसमभावा’ची महती सांगू नये कोणी, हे सत्य आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचे वास्तव फार विदारक असून क्लेशदायी आहे. आमच्या देशात, हिंदुस्तानात आलेल्या परकीयांची शिरगणती झालीच पाहिजे. द्विराष्ट्रवाद उकरून काढून एका राष्ट्राची मागणी करणारे ‘बांगला मुक्ती संग्रामा’त कुणाला मारत होते, छळत होते? भारतामधले अल्पसंख्याक सुखैनैव जगत असताना ‘शाहीनबाग’ उजाड करण्याचे षड्यंत्र कोणाचे? १४ ऑगस्ट, १९४७ची अमावस्या ही खरोखरच अंधारी काळरात्रच होती. धर्माधिष्ठित द्विराष्ट्रवादाला धूर्त ब्रिटिशांनी खतपाणी घालून फोफावू दिला. तत्कालीन कचखाऊ पुढार्‍यांनी कट्टरतावादी महंमद अली जिनांसमोर नांगी टाकली. प्राचीन हिंदुस्तानची चिरफाड झाली. रक्ताचे पाट वाहून जगाच्या नकाशावर नवीन देश जन्माला आला. प्रेतांच्या ढिगार्‍यावर हिरवे निशाण फडकले, त्याचे नाव ‘पाकिस्तान.’



सिंधु नदीच्या काठावर अनादी कालापासून सर्वधर्मसमभावाला प्राधान्य देणारी हिंदू संस्कृती एका क्षणात
‘काफरों की सरजमी’ झाली आणि मग बिगरइस्लामी समाजाची हेटाळणी व कत्तल सुरु झाली, ती आजतागायत पाकमध्ये चालू आहे. लवांकुशाने वसवलेल्या लाहोर व कुसूर या शहरावर यवनांनी घाला घालून तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. पाकिस्तानच्या निर्मितीच्या पूर्वी ज्या परिसरात लहान-मोठी ४२८ मंदिरे होती तेथे आत २६ तरी मंदिरे असतील का? या मंदिरांची जागा माथेफिरु धर्माधांनी बळकावून तेथे कत्तलखाने सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर उलट हिंदुस्तानातील मशिदी एकही वीट न हलता उभ्या आहेत. रामचंद्रांच्या जन्मस्थानावर उभ्या असलेल्या आक्रमकाच्या मशिदीवर बहुसंख्याकांनी हक्क सांगताच ज्यांनी गहजब केला, ते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची प्रार्थना स्थळे उद्ध्वस्त होताना मात्र मूग गिळून स्वस्थ बसतात. हिच स्थिती चर्च, कॅथेड्रल्सची आहे. गुरुद्वारांची आहे. रेव्हरंट थॉमस वॉल्पी फ्रेंच या बिशपने (१८७७) ख्रिश्चन धर्माचा प्रसार व प्रचार करताना ‘डिक्शनरी ऑफ इस्लाम’ संग्रहित केली. त्याने स्थापन केलेली चर्चआज भग्नावस्थेत उभी असून हिंदू, शीख व ख्रिश्चन समाजाचे पाकिस्तानमधील जीणे म्हणजे नरकयातना इतके भयावह झाले आहे. धर्मांधतेने बेफाम झालेले हे उन्मत्त आधुनिक रझाकार, अतिरेकी इस्लाम धर्माच्या बाहेरील इतर धर्मीयांना वासनेची शिकार समजून त्यांच्या लेकीबाळींचा ‘उपभोग’ घेऊन हत्या करतात.



काही दिवसांपूर्वी हसन अब्दाल या गावातील कन्हैयालाल या व्यापार्‍याची निर्घृण हत्या झाली
. शवविच्छेदनानंतर जमलेल्या हिंदू-शीख समुदायाने हंदुदरिया या भागात कन्हैयालाल यांचे प्रेत रस्त्याच्या मधोमध ठेवून आंदोलन छेडले. हिंदू खासदार आरिषकुमार यांच्या नेतृत्वाखाली रावळपिंडी-पेशावर हमरस्ता बंद होऊन वाहतूक ठप्प झाली. कन्हैयालाल हा धार्मिक वृत्तीचा सेवाभावी व्यापारी २००५ साली हसन अब्दालमध्ये स्थलांतरित झाला होता. पोलीस बंदोबस्तात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अशा अनेक अल्पसंख्याक धनिक, व्यापार्‍यांची सरेआम कत्तल पाकमध्ये वरचेवर होते. पाकी सरकार डोळे बंद करून नुसते पाहत नाही, तर त्याला प्रोत्साहनही देते. लुटलेली संपत्ती वाटून घेतली जाते हे सत्य आहे, वास्तव आहे.



फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात २२ टक्के हिंदू
-शीख समाजाचे व १२ टक्के ख्रिश्चन समाजाचे नागरिक राहत होते. आजघडीला हे प्रमाण १.७ टक्के इतके घसरले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या खानेसुमारीवर नजर टाकल्यास दिसते की, पाकिस्तानामधील दोनच जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लोकसंख्येच्या ४० टक्के हिंदू राहतात. या लोकांचे गार्‍हाणे आहे की, “आमच्या अत्याचाराविरोधात अनेक विनंत्या करूनही हिंदुस्तानी शासन पाकिस्तानी प्रशासनास जाब विचारत नाही. मदत तर दूरच.” न्यायालयात तक्रार केल्यास तेथेही अपयश, अवहेलना याचा फायदा तुम्हाला संरक्षण देतो म्हणून मुलींना ओढून जबरदस्ती धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. कराचीमध्ये सध्या ६० ते ७० हजार हिंदू उरले आहेत. १९९७-९८ मध्ये ही संख्या ९८ लाख, ५६ हजार, ३७८ इतकी होती. यात ९० टक्के मुसलमान व १० टक्के अल्पसंख्याक होते. आता तेथे हिंदू दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. आजच्या घडीला उमरकोट या जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे तीन लाख हिंदू आहेत. १३ कोटी इतकी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदूंची आबादी आता फक्त ३० लाखच उरली आहे. सिंध व बलुचिस्तान प्रांतात एकेकाळी हिंदूंचे बहुमत होते. तालिबानींच्या अत्याचारामुळे या प्रांतातून अल्पसंख्याकांचा सफाया झाला आहे. गेल्या सात वर्षांमध्ये क्वेटासारख्या व्यापार प्रभावित क्षेत्रात हिंदू व्यापार्‍यांचे शिरकाण करून संपत्ती, मालमत्ता लुटण्यात आली. या भागातील गुरू लखीचंद यांचे अपहरण जानेवारीत झाले. अजून त्यांचा ठावठिकाणा नाही. फाळणीच्या वेळी २२ टक्के हिंदूंची संख्या आता दोन टक्क्यांच्याही खाली आली आहे.



ख्रिश्चन समुदायाची स्थितीसुद्धा अशीच आहे
. पाकिस्तानात दुसर्‍या महायुद्धाच्या पूर्वी युरोपीयन लष्करी अधिकार्‍यांनी रुग्णालये, कॅथेड्रल्स, चर्च स्थापून स्थानिकांना ख्रिश्चन होण्यास प्रवृत्त केले. कराची जिल्हा विकास योजना मांडून गोवेकर ख्रिश्चनांची वर्णी या बंदरात लावण्यात आली. या मंडळींनी पाकिस्तानात कॅथलिक कम्युनिटी स्थापन करून ब्रिटिश सरकारच्या जोरावर ख्रिश्चन समुदायाने महमंद अली जिना यांची धूर्तपणे तळी उचलून धरली. पोठाण जोसेफ या तत्कालीन पाद्री पत्रकाराने ‘मुस्लीम लीग’चा १९४५ मध्ये प्रचार सुरू केला. १९४५ मध्ये पाकिस्तान पूर्णत: ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून जाहीर झाली. तत्पूर्वी जिना मात्र ‘सेक्युलर स्टेट’चा पुकारा देत होते. फाळणीच्या वेळी हिंदू व संपूर्ण शीख समाज हिंदुस्तानात आला. याउलट उत्तर भागातील अनेक ख्रिश्चन परिवार पाकिस्तानकडे वळले. पाकिस्तानमधील सिंध जेथे हिंदूंचे प्राबल्य होते, ते नामशेष झाले असून ख्रिश्चन हे पंजाब प्रांतात बहुसंख्येने तरी उरले आहेत. याचे कारण शीख व हिंदू यांना पाकिस्तानी समाज ‘काफर’ म्हणून हेटाळतात, तर अमेरिका-ब्रिटनला चुचकारत ख्रिश्चन्सना जवळ करतात. ख्रिश्चनांची पाकिस्तानमधील राजकीय संघटना कार्यरत आहे. पाकिस्तान ख्रिश्चन काँग्रेस, परंतु झुल्फीकार अली भुत्तो व जनरल झिया उल हक यांनी शरियतचे राजकीय पुनरुज्जीवन करताच १९७२ मध्ये कट्टरपंथीय गटांना प्रोत्साहन मिळून पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना ग्रहण लागले. अत्याचार वाढले.



१९०२ मध्ये
‘अखंड हिंदुस्थान’ असताना फादर फेलिक्स या धर्मप्रचारकाने एका गावाची स्थापना केली. या गावाचे नाव ‘खुशीपूर फेलिक्स’ म्हणजे खुशी, म्हणून ‘खुशीपूर’ या गावात शतप्रतिशत आबादी आहे ती ख्रिश्चनांची. येथे सकाळ-संध्याकाळ ऐकू येते ती फक्त चर्चची घंटा! १९०२ पासून आजातागायत या गावात ना बांग ऐकू आली ना नमाजची इबादत अदा झाली. १९४५ साली या गावाची आबादी होती १५ हजार. आज आहे फक्त ५,३००च्या आसपास. याच गावचे फादर जॉन जोसेफ यांना ईशनिंदा कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी आत्महत्या केली. दहशतवाद्यांनी हत्या केलेले पाकिस्तानचे अल्पसंख्याकमंत्री शहाबाज भट्टी हे पण या खुशीपूरचे! या उभयतांची कबर गावात असून सर्व नागरिक या थडग्यावर फुले अर्पण करतात. पाकिस्तानमध्ये धर्म विटंबनाविरोधी कायद्याचे ६९५ लोक गुन्हेगार म्हणून जेरबंद असून यात १३ टक्के ख्रिश्चन आणि उरलेले इतर अल्पसंख्याक म्हणजे हिंदूच! यात २३ जण फाशीची वाट पाहत एक एक दिवस ढकलत आहेत. या गावातील एक अध्यापक नाबर पीटर यांच्या पुढाकाराने तरुणांचे गस्तिदल (Patroling Squad) कार्यरत असून रात्री जागे राहून पहारा देतात. याच गावातील २२ तरुणांना न्यायालयातील चौकशीअंती परत तुरुंगात नेताना दहशतवाद्यांनी गोळीबारात ठार केले. चार ख्रिश्चन महिलांना विवस्त्र करून शहरभर फिरवून मारून टाकण्यात आले.



आम्ही १९७१च्या युद्धात चितगावमधील ‘पीएनएस बख्तीयार’ या नौसेना तळावर तीन हजारांपेक्षा जास्त युद्धकैदी ताब्यात घेतले. त्यात १०२ कैदी हे ‘मसीह’ या नावाने म्हणजे ख्रिश्चन होते. पाकिस्तान नेव्हीमध्ये ते (मेहतर) ‘टोपस’ म्हणून कार्यरत होते. त्यातील गौहर मसीह याने एकदा एकांतात सांगितले, आम्ही सर्वजण मूळ हिंदू भंगी. फाळणीनंतर सीमापार करताना आम्हाला अडवण्यात आले. हिंदुस्तानात जाण्यास मज्जाव का, तर आमचा मैला तुम्हीच वाहायचा, हा जबरदस्तीचा आदेश. मग धर्म बदलून झालो ख्रिश्चन. आम्ही सर्व १९४७ पासून जीवंत प्रेते आहोत.” त्याच्या या स्पष्टीकरणाने फाळणीच्या वेळेच्या भयानक सत्य तेव्हा उघडे पडले. दलित हिंदूंची झालेली ही अवस्था म्हणजे एक शोकांतिकाच नाही का?



पाकिस्तान सरकारने
‘धार्मिक विटंबना विरोधी कायदा’ जाहीर करून कट्टरतावादी धर्मगुरू व दहशतवाद्यांच्या हातात अल्पसंख्याक विरोधी जणू हत्यारच दिले आहे. या कायद्याचा आधार घेऊन गरीब व निरूपद्रवी हिंदू, ख्रिश्चन नागरिकांना फाशी देण्यात येत आहे. ‘कुराणचा अनादर केलाया तथाकथित व खोट्या आरोपावरून फैसलाबादमधील पाच चर्च, २७ ख्रिश्चन कुटुंबे, तीन शाळा, रुग्णालयांना मुस्लीम गुंडांनी आग लावून नेस्तनाबूत केले. तेव्हा, फैसलाबादमधील जीवाच्या आकांताने परागंदा झाले. खंडणीकरिता हिंदूंचे अपहरण करणे व फिरौतीची अपेक्षित रक्कम न मिळाल्यास त्या अपहृत व्यक्तीची हत्या ही पाकिस्तानात नित्याची बाब ठरली आहे.



बांगलादेशमध्ये शरणागतीच्या सोहळ्यानंतर स्थानिक जनता ओरडू लागली की
, ‘हिंदी सैन्य चालते व्हा.’ चितगाव बंदरामध्ये युद्धसमाप्तीनंतर ‘बडा बझार’ या भागात राहणार्‍या हिंदू कुटुंबांनी आम्हा सैनिकांना बोलावून आदर-सत्कार करताना तेथील गृहिणींच्या डोळ्यांत अश्रूंसह पाकिस्तानी सैन्याने व बंगाली कट्टर पंथीयांनी केलेले हाल सांगितले. तेथील हिंदू सांगत होते, “भारतीय सैन्य माघारी गेले की ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे आमचे हाल, छळ सुरू होणार,” ही प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. भारतात घुसणार्‍या दहशतवादी व समाजात फुटीचे विष पेरणार्‍या अभारतीय नराधमांना ओळखून पोलिसांच्या ताब्यात देणे, हिंदूंनी फुकाची धार्मिक आक्रमता सोडून देतानाच भारतीय मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य धारेत (main stream) मनोमिलनासह सहभागी होणे महत्त्वाचे आहे. धार्मिक समज, आचरण ही वैयक्तिक बाब समजून सर्वच भारतीय समाजाने राष्ट्रीय कायदे कानून पाळून राष्ट्रीय योजनांमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. सहिष्णुता हा सर्वच भारतीय समुदायांनी पारंपरिक संस्कार मानून एखाद्या ‘व्रता’प्रमाणे अंगीकारावा. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू इतरेतर धार्मिक समाज हा फक्त चार टक्क्यांपर्यंत सीमित होता. तो आता १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ‘हा देश माझा आहे. मी या देशाशी प्रामाणिक राहीन,’ ही प्रतिज्ञा करणे अगत्याचे असून प्रत्येकाने स्वत:ला राष्ट्रीय प्रवाहात झोकून देणे अपेक्षित आहे.

- विनायक अभ्यंकर 

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@