तुला शरम वाटायला हवी! : 'त्या' गायिकेवर भडकले अशोक पंडित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020
Total Views |
Ashik Pandit _1 &nbs
 
 
 

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर गायिका आली शंभर जणांच्या संपर्कात




लखनऊ
: लंडनहून परतलेल्या कनीका कपूरने कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती लपवली होती, इतकेच नव्हे तिने लखनऊतील गॅलंड अपार्टमेंटमध्ये रविवारी एका पार्टीतही ती सहभागी झाली होती. या सर्व प्रकारामुळे तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोना होण्याचा धोकाही कायम आहे. या सर्व प्रकारावर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी तिखट प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. 'कनीका कपूर तुम्हाला असे करताना शरम वाटायला हवी! तुचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेच आहेत. मात्र, ज्या शंभर जणांच्या संपर्कात तु आलीस त्यांचा जीवही तू धोक्यात घातला आहेस,'
 
 



 
 
कनीकाच्या या वर्तणूकीबद्दल आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. १५ मार्च रोजी लंडनहून लखनऊला आली होती. विमानतळावरील ग्राउंड कर्मचार्यां ची नजर चुकवून ती वॉशरूममध्ये लपून राहिली आणि काहीवेळाने संधी साधून तिथून पसार झाली. त्यांनतर तिने लखनऊच्या गॅलंट अपार्टमेंटमध्ये रविवारी एका पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत लखनऊमधील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते मंडळी हजर होती. मात्र आज ही घटना उघडकीस आल्यापासून संपूर्ण अपार्टमेंट खळबळ उडाली आहे.




@@AUTHORINFO_V1@@