अखेर निर्भयाच्या दोषींना फाशी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020
Total Views |

nirbhaya case_1 &nbs
 
 


नवी दिल्ली
: दिल्लीतील थरकाप उडवणाऱ्या निर्भयावर केलेल्या बलात्काऱ्यांना अखेर तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तिहारमध्ये पहाटे साडेपाच वाजता त्यांना फाशीवर देण्यात आली. अखेर ७ वर्ष ३ महिन्यानंतर निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयाने रात्री १२च्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
 
 
"शेवटी आमच्या मुलीला न्याय मिळाला. आज मी समाधानी आहे. कारण, संपूर्ण देशाला या घटनेनंतर शरमेने मान खाली घालावी लागली होती. आज संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे." अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे. १६ डिसेंबर २०१२ ला दिल्लीत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. बलात्कार करुन या दोषींनी निर्भयावर शारिरीक अत्याचार ही केले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक निदर्शने झाली, गुन्हेगारांनी अनेक प्रकारे फाशीपासून पाळण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ७ वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला.
 
@@AUTHORINFO_V1@@