मध्यप्रदेशमध्ये जनतेचा विजय : ज्योतिरादित्य शिंदे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020
Total Views |

kamlanath_1  H



ज्योतिरादित्य शिंदेंची कमलनाथांवर टीका
भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आल्याने त्यांनी आज राजीनामा देण्याची घोषणा केली. कमलनाथ यांनी बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले होते. कमलनाथ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘हा जनतेचा विजय आहे’, असे ट्विट करत कमलनाथ यांच्यावर टीका केली.





‘मध्य प्रदेशातील जनतेचा आज विजय झालाय. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे. पण राज्यातील काँग्रेस सरकार त्यापासून भरकटलं. पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला. सत्यमेवजयते’, अशा आशयाचे ट्विट करत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे.


मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. तरीही कमलनाथ यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. याविरोधात भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देत मुख्यमंत्री कमलनाथ यांना शुक्रवारी म्हणजे आज बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. पण त्यापूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.
@@AUTHORINFO_V1@@