मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020
Total Views |
kamalnath _1  H





मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळले


 
 
भोपाळ : मध्यप्रदेशातील सरकार अखेर कोसळणार असल्याचे निश्चित झाले आहे. अवघ्या १५ महिन्यांनंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला आहे. नाराज ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपप्रवेशानंतर कमलनाथ सरकारमधील तब्बल १६ आमदार आणि मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकार संकटात आले होते. 
 
 
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारची दुपारी १ वाजता बहुमत चाचणी होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार कोसळल्याची निश्चिती जवळपास झाली आहे. दुपारी मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निर्णयानुसार कमलनाथ यांना शुक्रवारी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचा वेळ होता मात्र, त्यापूर्वीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

@@AUTHORINFO_V1@@