आखातातून २६ हजार भारतीय मुंबईत परतणार

    20-Mar-2020
Total Views |
Mumbai Airport_1 &nb
 

महापालिकेकडून क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची तयारी


मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून आखाती देशातून २६ हजार भारतीयांना मुंबईत आणले जर आहे. महापालिकेतर्फे त्याची राहण्याची व्यवस्था क्वारंटाइनमध्ये करण्यात येणार आहे. देशभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती, कुवेत तसेच ओमानसारख्या आखाती देशात अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. येथील तब्बल २६ हजार भारतीय नागरिक ३१ मार्चपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने तयारीला सुरुवात केली आहे.
अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. येथून दररोज २३ विमाने भारतात येतात. जगभरात कोरोनाने थैमान घालून हजारोंचे जीव घेतले आहे. त्याचा प्रसार इतर देशातही झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आखाती देशातील भारतीय नागरिकांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भारतातही कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातल्याने लोकांमध्ये भीतीचे  वातावरण आहे. त्यामुळे परदेशातील भारतीयांना आणण्यापूर्वी त्यांची राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. 
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि ओमान यादेशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील हा आदेश १८ मार्चपासून लागू झाला आहे. आखाती देशातील सुमारे २६ हजार भारतीयांना मुंबईत आणल्यास त्यांची व्यवस्था कशी करावी, कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये याची खबरदारी यंत्रणेकडून घेतली जाते आहे.
कस होणार वर्गीकरण
आखाती देशातून येणारे भारतीय नागरिक ३१ मार्चपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. यापैकी येणाऱ्या लोकांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ज्यांचे मुंबईत घर आहे आणि ज्यांची प्रकृती उत्तम आहे त्यांना घरी सोडण्यात येईल. त्यांना आपल्या घरातील अन्य व्यक्तींपासून काही दिवस वेगळे राहावे लागणार आहे.
जे लोक मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणाहून असतील आणि ज्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नसेल त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे. त्यांचे घरीच त्यांना क्वारेनटाईन केले जाणार आहे. त्यांना घरी सोडताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करता, त्यांना खासगी वाहनातूनच पाठवण्याची सोय केली जाणार आहे.