‘मुंबई पुलिस पासपोर्टपर रिलीजन देखके गोली नही चलाती...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020
Total Views |
sooryavanshi_1  



‘सूर्यवंशी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित 

मुंबई : रोहित शेट्टीचा आगामी धमाकेदार बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’चा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शनापासूनच रोहित शेट्टीच्या या चित्रपटाबाबत सर्वांना कमालीची उत्सुकता होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच या ट्रेलर प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या दोघांसोबतच अजय देवगण, रणवीर सिंह देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.





'मुंबई हिंदुस्तान का दिल...' या अजय देवगणच्या आवाजातील वाक्याने 'सूर्यवंशी'च्या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर चित्रपटाचा नायक 'अक्षय कुमार'ची दमदार एंट्री होते. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ऐकू येणारा 'मुंबई पोलीस पासपोर्टपर रिलीजन देखके गोली नहीं चलाती' हा दमदार डायलॉग येत्या काळात नक्कीच हिट ठरणार आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंह, अजय देवगण, कतरिना कैफ त्याचप्रमाणे जॅकी श्रॉफ आणि जावेद जाफरीची झलक या चित्रपचटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. रणवीरचा 'सिंबा'मधील आणि अजयचा 'सिंघम'देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय आणि अजयच्या अॅक्शनने भरलेल्या ट्रेलरमध्ये रणवीरचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. २४ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@