खेलो इंडिया विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर

    02-Mar-2020
Total Views |

kelo india university_1&n
 
 
नवी दिल्ली : नुकताच, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी यामध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचा दुसरा क्रमांक आला आहे. पुणे विद्यापीठाच्या नावे १७ सुवर्ण, ११ रजत,९ कांस्य पादकांसह एकूण ३७ पदके आपल्या नावे केली आहेत. तर, पंजाब विद्यापीठ ४६ पादकांसह अव्वल स्थानी आहे.
 
 
 
 
 
 
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठ मात्र दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई विद्यापीठाने ६ सुवर्ण, ९ रजत आणि १० कांस्य पदकांसह एकूण २५ पदके जमा आहे. ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये रविवारी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला.