सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराची घसरगुंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2020
Total Views |

share market_1  
 
 
मुंबई : जगभरातील कोरोना विषाणूच्या संकटामुळे शेअर बाजारामध्ये सुरू असलेली पडझड कायम आहे. गुरुवारी बाजार सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) २०४५.७५ अशांनी कोसळला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांकही ५०५.२५ अशांनी खाली आला. सेन्सेक्स ३८ महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे, तर निफ्टी ७ हजार ९०० अशांवर पोहचल्याने डिसेंबर २०१६ च्या पातळीवर पोहचला आहे.
 
 
शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण सुरू असून सेन्सेक्स २६ हजारांचा टप्पा गाठला आहे. बजाज फायनान्सचे शेअर १३ टक्क्यांनी तर कोटक महिंद्रा बँक आणि इंण्डसलँण्ड बँक यांचे शेअर १० टक्क्यांनी घसरले आहेत. एचडीएफसीचे दोन्ही शेअर ७ टक्क्यांनी खाली आले आहेत. सेक्टरल निर्देशांकांमध्ये निफ्टी प्रायव्हेट बँकचा निर्देशांक सर्वाधिक घसरला आहे.
 
 
दरम्यान, भारतात आत्तापर्यंत १६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १४१ भारतीय आणि २५ परदेशी नागरिकांना लागण झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येक एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये ६ तर चंदीगडमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याने त्याचा शेअर बाजारावरही प्रभाव पडत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@