येस बँक आजपासून निर्बंध मुक्त होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |

yes bank_1  H x




संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होणार सर्व सेवा

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेवर आरबीआयने ५ मार्च ते ३ एप्रिल या काळासाठी निर्बंध घातले होते. त्यानुसार महिनाभरात खातेदारांना खात्यातून केवळ ५०००० रुपये काढता येणार होते. या निर्णयामुळे या बँकेतील खातेधारक मोठ्या धर्मसंकटात अडकले होते. ज्या खातेदारांची वर्षोनुववर्षे या बँकेत खाते आहे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. केंद्र सरकारने येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली होती. त्यानुसार, हे निर्बंध आजपासून हटविण्यात येत आहेत. आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून हे निर्बंध हटविण्यात येतील.


भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ मार्चपासून येस बँकवरील निर्बंध घातले होते. बँकेतून रक्कम काढण्यास निर्बंध घालण्यात आल्याने खातेदारांची सळो की पळो अशी अवस्था झाली होती. हे निर्बंध लवकरात लवकर हटविण्यात यावे अशी मागणी खातेदारांकडून होत होती. आजपासून ही बँक पूर्ववत सुरु होणार असून खातेधारक आजपासून पुन्हा सगळ्या सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.


रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर नेट बँकिंग, मोबाईल अॅप, डेबिट-क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि ATM या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. तसेच मोबाईल, इंटरनेट बँकींग या सेवाही बंद होत्या. गुगलपे, फोनपे यांसारख्या मोबाईल वॉलेट्स मधूनही येस बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नव्हते. मात्र हळूहळू एक-एक सुविधा पूर्ववत करण्यात आल्या.

आर्थिक संकटात अडकलेल्या येस बँकेला सावरण्यासाठी आयसीआयसी बँक, एक्सिस बँक, एडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांनी येस बँकेत एकूण ३१०० कोटी रुपये गुंतवण्याचे जाहीर केले आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेत एकूण ७२५० कोटी रुपये गुंतवणार असून एसबीआयकडे बँकेची ४९% भागीदारी राहील.
@@AUTHORINFO_V1@@