'दि टेलिग्राफ'ला 'त्या' मथळ्यावरून पाठवली कारणे दाखवा नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |

Telegraph_1  H
 
 
 
नवी दिल्ली : गेले काही दिवस चर्चा असलेल्या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र 'दि टेलिग्राफ'च्या वादग्रस्त हेडलाईन प्रकरणी आता कारवाई करण्यात येत आहे. भारतीय प्रेस परिषदेने वृत्तपत्राला करणे दाखवा नोटीस बजावली आहे. 'दि टेलिग्राफ' वृत्तपत्रामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तुलना विषाणूशी करण्यात आली होती. यावर अनेक जणांनी आक्षेप घेत त्या शिर्षकाचा निषेध केला होता.
 
 

notice for telegraph_1&nb 
 
 
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, १७ मार्च २०२० रोजी 'दि टेलिग्राफ' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका मथळ्याची दखल घेत कौन्सिलने ही कारवाई केली आहे. या मथळ्यामध्ये प्रसिद्ध वृत्तपत्राने व्यंगात्मक शैलीचा वापर करून राष्ट्रपतींचा अवमान केला आहे. तसेच पत्रकारितेतील नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेस संघटनेचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद यांनी या विषयाची दखल घेतली. पत्रकारिता आचरणांच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 'दि टेलीग्राफ'च्या संपादकांना नोटीस पाठविली आहे. प्रेस संघटनेने यामध्ये लिहिले आहे की, देशातील पहिले नागरिक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दलची बेजबाबदार प्रतिक्रिया, उपहासात्मक तुलना आणि त्यांची बदनामी करणे हे चांगले नसून ते पत्रकारितेच्या योग्य निकषांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे त्यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@