पुण्यात आणखी एक रुग्ण : राज्यात रुग्णाची संख्या ४२वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |

pune_1  H x W:
 
 
पुणे : जगभर थैमान घातलेल्या कोरोनाने भारतासह महाराष्ट्रातही दहशत पसरवली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बुधवारी पुण्यामध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १८ वर पोहचली असून महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ४२ वर गेली आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एका २८ वर्षीय महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. ही महिला १५ मार्चला फ्रान्स आणि नेदरलँड या देशांमधून प्रवास करून भारतात आली होती. कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला मंगळवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. फ्रान्स आणि नेदरलँड या देशातून आलेला एक प्रवाशी पॉझिटिव्ह सापडला आहे.
 
 
 
यादरम्यान, कोरोना बाधित रुग्णांमध्ये महाराष्ट्र सध्या पहिल्या स्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ४२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ३ परदेशी रुग्णांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळूहळू मुंबईसह पुण्यातील रस्त्यांवर गर्दी कमी होताना दिसत आहे. तसेच खबरदारी म्हणून नागरिकांनी घरी बसनेच पसंत केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@