'त्या' मृत्यूनंतर मुंबईला लागतोय हळूहळू ब्रेक ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |

mumbai corona_1 &nbs
मुंबई : मुंबईमध्ये मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी गेला. ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याने महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक कायदे करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरस जास्त पसरू नये यासाठी अनेक युक्तिवाद केले जात आहेत. जनसामान्यांमधून लोकल तसेच बेस्ट सेवा बंद ठवावी अशी मागणीदेखील होत आहे. परंतु, गरज पडल्यास तेही करू असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
 
 
बुधवारी मात्र मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळत होते. ऐन ऑफिसच्या वेळेस रस्त्यांवर गर्दी कमी दिसत होती. तर मुंबई लोकलमध्येही गर्दी कमी असल्याचे पाहायला मिळाले. तसेच, अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची योजना अमलात आणली आहे. त्यामुळे एका मृत्यूने मुंबईकरांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला असल्याचे बुधवारी दिसून आले. मुख्यमंत्र्यांनीही गरज असले तरच बाहेर पडा असे आश्वासनही केले आहे.
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव मुबई, पुणे सारख्या शहरांमध्ये प्रकर्षाने पाहायला मिळत आहे. पुण्यामध्येही रस्त्यांवर शुकशुकाट होता. हॉटेल्स, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, जिम, स्विमिंग पूल्स इत्यादी गोष्टी बंद असल्याने पुणेकरांनीही घरी राहणेच पसंत केले आहे. मंदिरांनाही बाहेरून टाळे लावण्यात आले आहे. देवाची पूजा केली जाईल परंतु, सामान्य नागरिकांना देवदर्शन करता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये कोरोना ग्रस्तांचा आकडा हा ४२वर येऊन पोहचला आहे. भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबादीहीत रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नयेस असाच सल्ला सर स्तरांमधून देण्यात येत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@