कोरोनामुळे पाकिस्तान भयभीत; विकसित देशांकडे केली मदतीची याचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |
pakistan_1  H x
 
 
 
पार्श्वभूमीवर कोरोनाच्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नेहमीप्रमाणे जागितक समुदायापुढे मदतीसाठी हात पसरले

इस्लामाबाद : जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस पाकिस्तानमध्येही वेगाने फैलावत आहे. आतापर्यंत पाकिस्तानमधील २०० पेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. कंगाल अर्थव्यवस्था आणि गरिबीमुळे अगोदरच धापा टाकत असलेला पाकिस्तान यामुळे आणखीनच अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नेहमीप्रमाणे जागितक समुदायापुढे मदतीसाठी हात पसरले आहेत.


पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. अशातच COVID-19 मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखीन फटका बसला आहे. त्यामुळे गरिबी आणि उपासमारीच्या समस्येत आणखीन भर पडू शकते. अशावेळी कोरोनाचा सामना करण्यासाठी विकसित देशांनी पाकिस्तानला कर्ज आणि आर्थिक मदत दिली पाहिजे. पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली तर वैद्यकीय व्यवस्था सांभाळणे अशक्य होऊन बसेल. त्यामुळे विकसित देशांनी पाकिस्तानला मदत करायला हवी, असे आवाहन इम्रान खान यांनी केले. यावेळी इम्रान खान यांनी इराणचे उदाहरणही दिले. इराणवर जागतिक समुदायाने अनेक निर्बंध लादल्यामुळे तेथे कोरोना व्हायरसमुळे अनेकांचे बळी जात आहेत, असे इम्रान खान यांनी सांगितले.


कोरोनाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नुकतीच सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली होती. या कॉन्फरन्सला इम्रान खान उपस्थित राहिले नव्हते. मात्र, या बैठकीत पाकिस्तानी मंत्र्याकडून काश्मीर मुद्द्यावरून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सार्क देशांसमोर एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव ठेवला होता. भारताकडून या फंडसाठी १ कोटी डॉलर देण्याचीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.


@@AUTHORINFO_V1@@