अंतिम न्याय मिळेलच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020   
Total Views |


nirbahaya_1  H


आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘निर्भया’ प्रकरण नेऊन भारताच्या न्यायप्रक्रियेची आणि एकंदर संविधानातील कायद्यांची बदनामी तर या लोकांना करायची नाही ना ? किंवा भारतीयांचा संविधानावरचा आणि कायद्यावरचा, लोकशाहीवरचा विश्वास उडावा यासाठी तर हे कटकारस्थान रचले गेले नसावे ना? अनेक प्रश्न समोर उभे राहतात.


खरे तर माणूस म्हणून ज्यांच्यात थोडी जरी संवेदनशीलता आहे, त्या सगळ्यांना वाटते की, ‘निर्भया’च्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी मिळावी. क्रूर सामूहिक बलात्कार करून निर्दयतेने तिच्या शरीरात रॉड घुसवणारे हे अत्याचारी, यांना जगायचे आहे. का? यांना जगवण्यासाठी यांचा वकील ए. पी. सिंग कायद्याचा कीस का पाडत आहे? मात्र, या गुन्हेगारांची वकिली का करतो हे सांगताना ए. पी. सिंग म्हणतात की, “या गुन्ह्यातील एक आरोपी अक्षय याची पत्नी तिच्या तीन महिन्यांच्या मुलासोबत घरी आली होती. तेव्हा माझ्या आईला तिची आणि तिच्या तीन महिन्यांच्या मुलाची दया आली. त्यामुळे आईने सांगितले की, हिला मदत कर. मी माझ्या आईचे म्हणणे ऐकत आहे.”



हे खरे असेल तर
, सिंग यांच्या आईला अक्षयची धडधाकट जिवंत पत्नी आणि मुलाची दया आली. मात्र, त्या भयाण रात्री सहा नराधमांच्या तावडीत सापडून शरीराने आणि मनानेही चिरडली गेलेली ‘निर्भया’, तिच्याबद्दल काहीच वाटले नाही? बेशुद्ध असतानाही ‘निर्भया’च्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तिच्यासोबत किती भयानक क्लेशकारक घडले, हे अश्रू त्याची साक्ष होते. मरण्याआधी ‘निर्भया’ तिच्या आईला म्हणाली होती, “आई, मला जगायचे आहे.” तिच्या जगण्याचे मोल काहीच नव्हते? ए. पी. सिंग यांच्या आईला या ‘निर्भया’ला न्याय मिळावा असे वाटले नाही? खरे तर वकील म्हणून आपण किती डावपेच खेळू शकतो आणि कायद्याला किती झुलवू शकतो, हा कैफ ए. पी. सिंग यांना चढला आहे. मात्र, ते विसरले आहेत की, कायद्याचा कीस काढून कितीही वाचवलेत तरी, अधर्मी आणि त्यांना साथ देणार्‍यांनाही शेवटी एका न्यायालयात जाब द्यावाच लागतो. ते न्यायालय आहे परमेश्वराचे, निसर्गाचे. तिथे सरतेशेवटी न्याय होतोच. तिथे कोणतीही पळवाट नसते. ना हे चार नराधम आणि तो पाचवा सुटलेला अल्पवयीन क्रूरकर्मा आणि त्यांना साथ देणारे सर्वच. सर्वांना हिशोब द्यावाच लागेल. अर्थात, पापपुण्य आणि नैतिकतेचे भय आणि चाड असती तर हे गुन्हेगार ‘निर्भया’वर अत्याचार करण्यास धजावलेच नसते आणि त्यांच्या राक्षसी कृत्याची भलामण करत त्यांना वाचवणार्‍यांना पण इतका पाशवी कैफ चढला नसता.



फाशीची शिक्षा लवकरच



निर्भया
चे गुन्हेगार करंटे जगण्यासाठी एकापेक्षा एक डावपेच खेळत आहेत. आता तर म्हणे यातील पवन गुप्ता, अक्षय सिंग आणि विनय शर्मा फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार आहेत. ड्रायव्हर, क्लीनर, फळविक्रेते, जिम ट्रेनर यांना इतके कायद्याचे डावपेच माहिती असणे शक्यच नाही. त्यांना वाचवून आपण कसे खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे करू शकतो, असा तर काही लोकांचा प्रयत्न नाही ना? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘निर्भया’ प्रकरण नेऊन भारताच्या न्यायप्रक्रियेची आणि एकंदर संविधानातील कायद्यांची बदनामी तर या लोकांना करायची नाही ना ? किंवा भारतीयांचा संविधानावरचा आणि कायद्यावरचा, लोकशाहीवरचा विश्वास उडावा यासाठी तर हे कटकारस्थान रचले गेले नसावे ना? अनेक प्रश्न समोर उभे राहतात.



गुन्हेगार गरीब आहेत
, त्यांचे कुटुंब आहे आणि यांना कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही म्हणून त्यांना फाशीची शिक्षा देऊ नका, असे म्हणणारे मोजून दोन चार लोक आहेत. त्यात वकील ए. पी. सिंग आहेतच. तो त्यांचा व्यवसाय आहे, असे मानू. पण, यात महिलाही असाव्यात, हे दुर्देव. याच विचारांच्या इंदिरा जयसिंग नावाच्या बाईही आहेत. याच विचारांच्या ए. पी. सिंगची आईही आणि विनय शर्माची बहीणही आहे आणि अक्षय ठाकूरची पत्नी पुनिताही आहे. या सर्व महिलांना एकच प्रश्न आहे, ‘निर्भया’च्या जागी स्वत:ला अनुभवा आणि मग बोला. खरे तर नराधमांची आई, पत्नी, बहीण, शुभचिंतक म्हणवून घेताना यांचा अंतरात्मा जिवंत असतो का? खात्रीने नाही. या गुन्हेगारांच्या नात्यातील काही महिला नातेसंबंध जपत आहेत. मात्र, ‘निर्भया’वर अत्याचार करताना, आपणही कुणाचा मुलगा, भाऊ, पती आहोत, असे या नराधमांना चुकूनही वाटले का? यावर या चार टाळक्यातील काही म्हणतात, “घृणा गुन्ह्याशी करा, गुन्हेगारांशी नाही.” हे जरी खरे असले तरी या गुन्हेगारांनी केलेले कृत्य अमानवीय आहे. पूर्वी ते कितीही सज्जन असले तरी एका क्षणी ते राक्षस होते, हेच सत्य आहे. यांना फाशी व्हायला हवी. मात्र, सामाजिक न्याय तेव्हाच होईल, जेव्हा अल्पवयाचा फायदा घेत सुटलेल्या त्या पाचव्या नराधमालाही शिक्षा होईल.

@@AUTHORINFO_V1@@