यादवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |


yadavi_1  H x W


महायुद्धापूर्वी अपशकुन झाले होते, तसेच पुन्हा होऊ लागले होते. त्याला कळत नव्हते नक्की काय होणार आहे? श्रीकृष्णाला मात्र अंत:प्रेरणेने कळले की, आता वृष्णी घराण विलयास जाणार आहे. गांधारीने दिलेला शाप खरा होणार होता.



आपल्या मातेच्या मृत्यूचे दु
:ख विसरायला पांडवांना अनेक वर्षे लागली. परंतु, शेवटी काळ हे असे औषध आहे, जे सगळ्या जखमा भरून काढते. अभिमन्युपुत्र परीक्षित हाच सर्वांच्या मनाचा विसावा होता, त्यामुळे ते आपली वेदना व दु:ख विसरू शकले. युधिष्ठिरायुधिष्ठिराने जवळ जवळ ३६ वर्षे उत्तम राज्य केले. पण, त्याला आतासे पुन्हा कसले तरी मोठे संकट येणार आहे, अशी चाहूल लागत होती. जसे महायुद्धापूर्वी अपशकुन झाले होते, तसेच पुन्हा होऊ लागले होते. त्याला कळत नव्हते नक्की काय होणार आहे? श्रीकृष्णाला मात्र अंत:प्रेरणेने कळले की, आता वृष्णी घराण विलयास जाणार आहे. गांधारीने दिलेला शाप खरा होणार होता.



एकदा विश्वामित्र
, कण्व व नारद ऋषी द्वारकेस आले होते, तेव्हा वसुदेवाच्या घरातीलतरुणांनी त्यांची चेष्टा करण्याचा बेत केला. त्यांच्यातील सांब नावाच्या मुलाने स्त्री वेष परिधान केला. सर्व तरुण मुलांनी या सांबाला ऋषींच्या पुढे उभे केले व सांगितले, “ही गरोदर आहे. तुम्हाला भविष्य कळते असे म्हणतात. मग हिला कन्या होईल की पुत्र, सांगा पाहू!” ऋषींना या पोरकट थट्टेचा खूप राग आला व त्यांनी शाप दिला. “या स्त्रीच्या पोटी लोखंडी मुसळ जन्माला येईल आणि हे मुसळच वृष्णींचा नाश करील.” हा शाप ऐकताच सगळेच घाबरले त्यांनी ऋषींची क्षमा मागून त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भविष्यकाळ त्यांच्या विनाशाचीच वाट पाहत होता! ते सारे बलरामाकडे गेले व त्याला सारे सांगितले, पण व्यर्थ! सांबाने लोखंडी मुसळाला जन्म दिला होता. बलरामाने त्या लोखंडी मुसळाचा भुगा करा, अशी आज्ञा दिली. तो भुगा समुद्रात फेकण्यात आला. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. काही दिवसांनी ही गोष्ट तर सर्व लोक विसरून गेले, पण श्रीकृष्णाला मात्र त्याचा विसर नव्हता पडला.


महायुद्ध होऊन ३६ वर्षे झाली होती
. आकाशात अनेक अपशकुन घडत आहेत, हे श्रीकृष्णाच्या लक्षात आले. त्याचा अन्वयार्थ वृष्णी घराण्याचा नाश लवकरच होणार व गांधारीने दिलेला शाप खरा ठरणार हाच आहे, हेही त्याला कळले. श्रीकृष्ण पण आयुष्याला कंटाळला होता. लोक धर्म विसरू लागले होते. कलियुगाची ही सुरुवात होती. या कलियुगाच्या अंती आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, हे त्याला माहिती होते. द्वारकेच्या लोकांनी तर सदाचरण सोडून कहर मांडला होता. सगळीकडे कलह माजला होता.


एकदा प्रभास तीर्थावर शंकराच्या पूजेसाठी सारे एकत्र आले होते
. त्यानिमित्ताने त्यांनी खेळ खेळण्यास सुरुवात केली. कृतवर्मा, सात्यकी व यदुकुळातील सारे तिथे जमले होते. त्यामुळे थोडे मदिरायनही झाले होते. सात्यकीने कृतवर्माची कुरापत काढली. तो म्हणाला, “मी असा क्षत्रिय पाहिलाच नव्हता, जो शत्रूंना झोपेत मारतो व चोरासारखा शत्रूच्या तंबूंना आग लावतो. इतकेच नाही तर हे सर्व करून पळून जातो.” हे ऐकून कृतवर्मा रागावला व त्याने भुरिश्रवाच्या वधाचा विषय काढला. सात्यकी व कृतवर्मा असे दोन गट पडले! वादामधून हाणामारीस सुरुवात झाली.


सात्यकीने कृतवर्माचा शिरच्छेद केला
. श्रीकृष्ण पुत्र प्रद्दुम्नसुद्धा सात्यकीच्या बाजूला होता. काहींनी बांबू हातात घेऊन मारामारी सुरू केली. हे समुद्रातील बेटावर मुसळातून निर्माण झालेले बांबू होते! लोखंडी मुसळातून बांबूचे बेटच उगवले होते. श्रीकृष्णाने उद्वेगाने आणखी काही बांबू उपसून त्यांच्या हातात दिले. त्याचे रुपांतर भयंकर शस्त्रांमध्ये झाले. सर्व यादव एकमेकांशी लढून मरत होते. काही क्षणातच सारे ठार झाले. फक्त श्रीकृष्ण, बलराम व दारुक जीवंत राहिले. बलरामाला हे सारे पाहून मोठाच धक्का बसला होता. तो प्राणत्याग करायला निघाला. कृष्णाने दारुकला सांगितले की, “युधिष्ठिर, अर्जुन व सर्व पांडवांना बोलवून आण. दारू पिऊन सर्व वृष्णी घराणे नष्ट पावले आहे, हे सांग.” दारुक दु:खी होऊन हस्तिनापुरात पोहोचला. श्रीकृष्ण बलरामाला म्हणाला, “बंधू, तुम्ही माझ्याकरिता थोडे थांबा. मी येथील मुलांना व स्त्रियांना द्वारकेला नेऊन वसुदेवांकडे सोपवून येतो. मग आपण दोघेही बरोबरच जाऊ या.”


श्रीकृष्ण द्वारकेला गेला
. वसुदेवांना सारे कथन केले. आपल्या वडिलांच्या पाया पडून निरोप घेतला व त्वरेने बलरामाजवळ परतला. बलरामाने फक्त त्याच्याकडे पाहिले व तो समाधीस्थ झाला. एक महाबलाढ्य पांढरा शुभ्र सर्प बलरामाच्या मुखातून बाहेर पडला व समुद्रात जाऊन नाहीसा झाला. बलराम शेषाचा अवतार होता, तर श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार! बलरामाचा अवतार संपला म्हणजे आता आपलाही अंत जवळ आाला आहे, हे श्रीकृष्णाला कळले.


- सुरेश कुळकर्णी 
@@AUTHORINFO_V1@@