'मोदी सरकारही तिला वडिलांप्रमाणे, पंतप्रधान मोदींचे आभार...'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |
 
narendra modi_1 &nbs


नवी दिल्ली : कोविड १९ म्हणजेच कोरोनाशी जगभरातील सर्व देश चार हात करत आहेत. परंतु भारतात या महामारीला ज्या पद्धतीने भारत सरकार तोंड देत आहे त्यासाठी संपूर्ण जगभरात भारताची प्रशंसा होत आहे. यातच महाराष्ट्रातील एका तरुणीच्या पालकांनी आपल्या मुलीला भारत सरकारने इटलीतील मिलानमधून सुरक्षित भारतात परत आणल्याबद्दल मोदी सरकारचे भरभरून कौतुक केले. ते म्हणतात, मी आधी मोदी सरकारवर टीका करायचो. पण भारत सरकारने एका वडिलांप्रमाणे आपले कर्तव्य निभावले आहे.



१५ मार्च रोजी सुजय कदम यांची मुलगी भारतात परतली. यानंतर तिला आयटीबीपी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. एखादे पालक आपल्या मुलांची काळजी घेतात अगदी त्याप्रमाणे सरकारने रुग्णांच्या औषध, जेवणाची सोय केली होती, असेही त्यांनी सांगितले. सुजय कदम यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सगळा घटनाक्रम सांगितले. त्यांनी भारत सरकारच्या कामगिरीची स्तुती केली आहे. सुजय कदम हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांची मुलगी उच्चशिक्षणासाठी ४ फेब्रुवारीला इटलीत गेली होती. पण अचानक करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इटलीतील सर्व कॉलेज बंद करण्यात आले. २८ फेब्रवारीला तिने मला सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले. तिने चार महिन्यांसाठी घर भाड्याने घेतले होते. पण १० मार्चला शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते.” असेही सुजय कदम सांगतात.



त्यानंतर काहीच दिवसात लॉक डाऊन करण्यात आल्याने परिस्थिती अधिक बिघडली होती. सुजय कदम यांनी आपल्या मुलीला भारतात परतण्यास सांगितले. परंतु, इटली सरकार तिला भारतात परतण्यासाठी ओळख पटवून देण्यास सांगत होते. या सर्व आणीबाणीच्या परिस्थितीत सुजय कदम यांनी १२ मार्च २०२० रोजी भारतीय दुतावासाला मेल पाठवला. यावर लगेच उत्तर येणार नाही असेच त्यांना वाटत होते परंतु १३ मार्चला त्यांना भारतीय दुतावासाकडून फोन आला. यावेळी तुमची मुलगी १४ मार्च रोजी भारतात परतण्यासाठी निघणार असल्याचे त्यांना कळले याबातमीने त्यांना धीर मिळाला. १५ मार्च रोजी सुजय कदम यांची मुलगी भारतात परतली. यानंतर तिला आयटीबीपी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. एखादे पालक आपल्या मुलांची काळजी घेतात अगदी त्याप्रमाणे सरकारने रुग्णांच्या औषध, जेवणाची सोय केली होती असेही त्यांनी सांगितले. परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यापासून ते विलगीकरण कक्षात ठेवण्याची सोय उभारण्यापर्यंत आणि देशभरात त्याचा प्रसार नियंत्रित करण्यापर्यंत, भारत सरकारने ही आपत्तीजनक परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळली आहे.
@@AUTHORINFO_V1@@