कोरोनानंतर माकडतापाने महाराष्ट्र हैराण ; २ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2020
Total Views |

sindhudurg_1  H
सिंधुदुर्ग : कोरोना व्हायरसने दहशत पसरवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हात माकडतापाचे लोन पसरले आहे. माकडतापामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. हे दोघे देगाव आणि पडावे गावातील असल्याची माहिती दिली आहे. दोडामार्ग तालुक्यात ८ गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्यावर्षीही या तापाने सिंधुदुर्गमध्ये थैमान माजवले होते.
 
 
 
माकडाना झालेल्या विशिष्ठ आजारात माकडाचा मृत्यू होतो. त्या माकडावरची गोचीड जर माणसाला चावली तर तो आजार माणसाला होऊन कमी प्रतिकारशक्ती असलेल्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे यावर आता सरकारी यंत्रणा कामाला लागली असून यावरील लसींची उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा विळखा असताना या नव्या संकटामुळे सिंधुदुर्गचे नागरिक हैराण झाले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@