गावात शिरलेले हत्ती 'वाईन' पिऊन तरर्र होतात तेव्हा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2020
Total Views |
elephants_1  H
 
 
 

 मक्यापासून तयार केलेल्या वाईनवर हत्तींनी डल्ला मारून ती फस्त केली

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - आजवर तु्म्ही एखाद्या दारुड्याला झिंगलेल्या अवस्थेत रस्त्यात पडलेले पाहिले असेल. पण चीनच्या ओहाई प्रांतातील मन्माई गावामधील ग्रामस्थांनी चक्क काही हत्तींना वाईन पिऊन चहाच्या मळ्यात तरर्र झालेल्या अवस्थेत पाहिले. १० मार्च रोजी रात्री काही हत्तींनी मन्माई गावात शिरून पिकांची नासधूस केली. यावेळी त्यांनी गावात मक्यापासून तयार केलेल्या वाईनवर डल्ला मारून ती फस्त केली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी या कळपामधील काही हत्ती झिंगलेल्या अवस्थेत शेतात निपचिप पडून होते.
 
 

elephants_1  H  
 
 
चीनमधील ओहाई प्रातांत अजबच घटना घडली. १० मार्च रोजी रात्री गाव शांतपणे झोपी गेलेले असताना अचानक हत्तीच्या कळपाने गावात शिरकाव केला. या कळपात १४ हत्तींचा समावेश होता. या हत्तींनी गावात शिरताच उस आणि मक्याच्या शेतावर डल्ला मारला. यावेळी कळपातील काही हत्तींनी गावातील घरांमध्ये शिरून मिळेल ते खाण्यास आणि नासधूस करण्यास सुरुवात केली. त्यापैकी काही हत्तींना एका घरात मक्यापासून तयार केलेली वाईन सापडली. मग काय, हत्तींनी ती देखील फस्त केली. मात्र, त्याचे परिणाम या हत्तींना भोगावे लागले.
 
 
 

elephants_1  H  
 
 
 
वाईन पिऊन तरर्र झालेले काही हत्ती गावकऱ्यांना दुसऱ्या दिवशी चहाच्या मळ्यात झिंगलेल्या अवस्थेत पडलेले सापडले. या हत्तींना कसलीच शुद्ध नव्हती. नेशेमुळे त्यांना हालचालही करता येत नव्हती. बराच वेळ ते मळ्यात निपचिप पडून होते. हे पाहून गावकऱ्यांना हसू आवारता आले नाही. परंतु, या प्रकारामुळे गावात बरेच नुकसान झाले. हत्तीच्या कळपाने ११ एकर ऊसाची शेती, ३५ घरे, २ सौर उर्जा पॅनल, १.५४ टन मका आणि ०.२४ टन तांदळाचे नुकसान केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
 

elephants_1  H  
@@AUTHORINFO_V1@@