आता 'या 'कंपन्या करणार झिरो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2020
Total Views |

domino's swiggy_1 &n
 
 
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वत्र लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सांभाळण्यासाठी अनेक कंपन्यांकडून अनेक युक्तिवाद लावले जात आहेत. अशामध्ये डॉमिनोज आणि मॅकडोनाल्ड या दोन्ही कंपन्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'झिरो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी' ही योजना अमलात आणली आहे. त्यापाठोपाठ स्विगी आणि झोमॅटोनेही हा निर्णय घेतला.
 
 
काय आहे झिरो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी?
 
 
ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर कंपनीचा 'सेफ डिलिव्हरी एक्सपर्ट' ती ऑर्डर घेऊन ग्राहकाकडे जाणार आहे. तसेच त्यांची ऑर्डर ग्राहकांसमोर ठेवेल आणि काही अंतरावर जाऊन उभा राहिल. जोपर्यंत ग्राहक स्वत: ती ऑर्डर घेत नाही तोपर्यंत डिलिव्हरी एक्सपर्ट त्या ठिकाणाहून जाणार नाही, अशा प्रकारची ही सुविधा असणार आहे. मॅक डोनाल़्डनंही अशा प्रकारची कॉन्टॅक्टलेस सेवा सुरू केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@