'कुठून आला हा कोरोना', म्हणणारा डॉक्टर गोत्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2020
Total Views |
Corona _1  H x




महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने धाडली नोटीस



मुंबई : 'कोरोना विषाणू भारतीयांचे काहीही वाकडे करू शकत नाही', असा दावा करणाऱ्या डॉक्टराला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) नोटीस पाठवली आहे. दादरमध्ये काम करणाऱ्या या डॉक्टरांचे नाव अनिल पाटील असून त्यांनी दिलेली एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एमएमसीने याची दखल घेत स्पष्टीकरण मागविले आहे.


एमएमसी नोंदणीकृत डॉक्टर सरकारने जारी केलेल्या शिफारसी आणि मार्गदर्शक तत्वांविरोधात वक्तव्य करू शकत नाही. त्यामुळे पाटील यांच्याकडून हे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. नोटीशीला मिळालेल्य़ा उत्तरात समाधान न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.


कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यापासून एमएमसीने प्रथमच ही नोटीस पाठवली आहे. आवश्यक ती पदवी नसतानाही ते स्वतःला आयुर्वेदीक डॉक्टर म्हणवून घेतात. डॉ. पाटील यांची नोंद एक एमबीबीएस पदवीधारक म्हणून असून त्यानुसारच त्यांनी प्रॅक्टीस करायला हवी, असे एमएमसीचे म्हणणे आहे.


पाटील यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 'कोरोना भारतीयांचे काहीही बिघडवू शकत नाही. भारतातील वातावरणात हा विषाणू टीकू शकत नाही. हा आजार म्हणजे चीनची लहर असून त्याद्वारे मास्क आणि लस विक्री वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला गेला असल्याचा दावाही त्यांनी केला होता.' तसेच Severe Acute Respiratory Syndrome म्हणजेच SARS चा भारतीयांवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा आपण केल्याचंही डॉ. पाटील यांनी मुलाखतीत म्हटले आहे.



डॉ. पाटील यांच्या या मुलाखतीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, तसेच ते स्वतःकडे दुर्लक्ष करू शकतात. राज्यात जिथे कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वात जास्त आहे, मुंबईत जिथे सर्वात जास्त लोक प्रवास करतात त्या ठिकाणी सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज असताना अशा वक्तव्याने चुकूची माहिती लोकांमध्ये पसरेल, अशी भीती प्रशासनाला आहे. अन्य कुठलाही डॉक्टर अशाप्रकारे कोरोनाबद्दल अपप्रचार करत असेल तर या संदर्भातील तक्रार करण्याचे आवाहन एमएमसीने केले आहे.




@@AUTHORINFO_V1@@