कोरोनामुळे सोन्याचे भाव गडगडले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2020
Total Views |

gold price_1  H 




सोने २०००, तर चांदी ६००० रुपयांनी स्वस्त
मुंबई : कोरोना विषाणूने कमॉडिटी बाजाराला मोठा फटका बसला आहे. सोने आणि चांदीची खरेदी विक्री ठप्प झाल्याने, मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.. बऱ्याच कालावधीनंतर सोन्याचा भाव ४० हजारांखाली गेला असून ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी चालून आली आहे.


आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ३९ हजार ६५० रुपये प्रती १० ग्रॅम इतका घसरला आहे. सोमवारी कमॉडिटी बाजारात सोनं २००० रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीच्या दरात तब्बल ६००० रुपयांची घसरण झाली होती. चांदीचा भाव ३६ हजार ६४० रुपये झाला होता. कोरोनाने भांडवली बाजाराबरोबरच कमॉडिटी बाजाराला जोरदार तडाखा दिला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज शुद्ध सोन्याचा भाव ४०१९५ रुपये आहे. २३ कॅरेट सोन्याचा भाव ४००३४ रुपये आहे. चांदीचा भाव ३६१२५ रुपये आहे.



मागील आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याची आयात थांबली आहे. यामुळे सराफा बाजारातील व्यवहार ठप्प आहेत, असे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले. वायदे बाजारात गोल्ड ईटीएफवर विक्रीचा दबाव आहे. त्यामुळे सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@