कोरोनामुळे मध्य रेल्वेच्या 'या' गाड्यांना ब्रेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2020
Total Views |

trains_1  H x W
 
 
मुंबई : कोरोनाने हाहाकार माजवला असताना मध्य रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या २२ गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्मवरची गर्दी टाळावी म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये इतके केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्णय मध्य रेल्वेने घेतले आहेत. ट्विट आणि एका पत्रकाद्वारे रेल्वेने ही माहिती दिली आहे.
 
 
 
 
रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस
 
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
मुंबई- नागपूर अजनी एलटीटी एक्स्प्रेस
मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस
पुणे-अमरावती एक्स्प्रेस
पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस
मुंबई-मनमाड एक्स्प्रेस
मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस
भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस
मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस
मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस
कलबुर्गी हैदराबाद इंटरसिटी एक्स्प्रेस
 
 
@@AUTHORINFO_V1@@