जेएनयूत मार्गाला वि.दा.सावरकरांचे नाव : डाव्यांना पोटशूळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020
Total Views |
V D Savarkar Marg _1 




नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठानजीक सुबनस्टार हॉस्टेल येथील एका रस्त्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्ग, असे नाव देण्यात आले आहे. मात्र, जेएनयूतील डाव्या विद्यार्थी संघटनांना या कारणामुळे पोटशूळ उठले आहेत. 'हे आमच्यासाठी लाजीरवाणे आहे', असे सांगत या नामकरणाची निंदा केली आहे.
 
 
 
जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईषी घोष हिने एक छायाचित्र शेअर केले आहे. यात रस्त्याचे नामकरण विनायक दामोदर सावरकर मार्ग असे केल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, यावर गरळ ओकत आईषीने वादग्रस्त टीपण्णी केली आहे. "जेएनयूसाठी ही शरमेची गोष्ट आहे. की, या व्यक्तीचे नाव या विद्यापीठात ठेवण्यात आले आहे. सावरकर आणि त्यांच्या अनुयायांसाठी इथे कुठली जागा आहे न भविष्यात असेल."
 
 
 
यापूर्वी अशाच प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावरून जेएनयूत राजकारण रंगले होते. त्यावेळी तत्कालीन छात्रसंघटनेचे अध्यक्ष शक्ती सिंह याने विनापरवानगी विनायक दामोदर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंहांची प्रतिमा बसवली होती. यानंतर सावरकरांच्या प्रतिमेची विटंबनाही करण्यात आली होती. आईषी घोषच्या या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.





@@AUTHORINFO_V1@@