कोरोना कहर (भाग १)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020
Total Views |
corona _1  H x



सध्या संपूर्ण जगभरात चर्चेत असणारा व त्याचबरोबर सर्व जगाला भयग्रस्त करणारा विषय म्हणजे ‘कोरोना’ व्हायरस. या कोरोना व्हायरसबद्दल विविध बातमीस्रोतांमधून वेगवेगळ्या बातम्या रोज येतच आहेत. परंतु, बर्‍याचदा या बातम्यांमध्ये विसंगतीही दिसून येते. अशा बातम्यांमुळे सामान्य जनतेमध्ये फार गोंधळ उडतो व अशा आजाराच्या साथींमध्ये आपण नक्की करायचे तरी काय, हे त्यांना कळत नाही. आपली नियमित लेखमाला थोडी बाजूला ठेवून आजपासून आपण ‘कोरोना’बद्दल सत्य माहिती जाणून घेऊया.


साधारणपणे नोव्हेंबर व डिसेंबरच्या २०१९च्या महिन्यांत चीनमधील वुहान या शहरामध्ये अचानकपणे श्वसन संस्थेशी निगडित आजारामुळे अनेक लोक आजारी पडू लागले. बर्‍याच लोकांना तर न्यूमोनियाची लागण झाली व नक्की आजार काय आहे, हे कळेकळेपर्यंतच अनेक लोकांना गंभीर समस्या निर्माण झाल्या. काही लोकांचा यादरम्यान मृत्यूदेखील झाला. या आजाराचा शोध घेत असता असे लक्षात आले की, मासेविक्रीचे मार्केट व जीवंत प्राणी विकण्याचा बाजार असतो, त्यात काम करणार्‍या लोकांना या रोगाची जास्त लागण झाली होती. तपासणीच्या दरम्यान असे कळून आले की, एक प्रकारच्या नवीन विषाणूमुळे हा आजार होत आहे. या नवीन विषाणू किंवा व्हायरसचे नाव आहे ‘कोरोना.’ वैद्यकीय संज्ञेत त्याचे नाव आहे '2019 Ncov 2019 NOVEL CORONA VIRUS.'


‘कोरोना’ या शब्दाचा अर्थ ‘क्राऊन’ म्हणजेच मुकुट. कोरोना व्हायरसची शरीर संरचना (ANATOMICAL STRUCTURE) ही एखाद्या काटेरी मुकुटाप्रमाणे आहे. या कोरोना व्हायरसचे शरीर एक प्रकारच्या विशिष्ट प्रथिनाने बनलेले आहे.


हा कोरोना व्हायरस शरीरातील पेशींमध्ये कसा प्रवेश करतो? या कोरोना व्हायरसच्या मुकुटासारख्या संरचनेमुळे तो शरीरातील पेशींना चिकटून राहतो व आत प्रवेश करतो, यालाच ‘स्पाईक प्रोटीन’ असे म्हणतात.


कोरोना व्हायरस शरीरातील पेशींना दूषित करण्यासाठी व संख्येने वाढण्यासाठी विविध प्रकारच्या प्रथिनांचा वापर करतो. परंतु, सर्वात महत्त्वाचे ‘स्पाईक प्रोटीन’ असते. हे ‘स्पाईक प्रोटीन’ शरीरातील ‘रिसेप्टर’ प्रथिनांना पकडून ठेवतात व शरीरात येतात. या व्हायरसचा शरीरात प्रवेश झाला की, व्हायरसचे अंतर्गत आवरण मानवी पेशीच्या आवरणाशी संलग्न होऊन एकमेकांत विरून जाते व विषाणूची सर्व जनुकीय रचना मानवी पेशीत प्रवेश करते आणि इथेच प्रत्यक्ष संसर्गाला सुरुवात होतेत. जर मानवी पेशींच्या आवरणाने त्या विषाणूला आत येण्यापासून रोखले, तर या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही. म्हणजेच ज्याची रोगप्रतिकारकशक्ती व चैतन्यशक्ती मजबूत आहे, त्यांना या व्हायरसमुळे लागण होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाली आहे, त्यांच्याच शरीरात हा व्हायरस घुसू शकतो. शरीरात विषाणूचा प्रादुर्भाव झाली की या शरीराच्या प्रतिकारशक्तीनुसार शरीर प्रतिजैविक म्हणजेच ‘अ‍ॅण्टिबायोटिक्स’ तयार करते. परंतु, जर या विषाणूचा हल्ला जोरदार असेल व विषाणू जास्त शक्तीशाली असेल तर ही प्रतिजैविके तयार होण्यास वेळ लागू शकतो. म्हणूनच मग यावर बाहेरून इलाज केला जातो. पुढील भागात आपण या आजाराची लक्षणे चिन्हे व उपचार यावर माहिती घेऊया.

(क्रमश:)


- डॉ. मंदार पाटकर
@@AUTHORINFO_V1@@