कोरोनामुळे राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये बंद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2020
Total Views |
forest_1  H x W
 
 
 

१८ मार्च पासून निर्णय लागू

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वन विभागाने राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च, २०२० पर्यंत राज्यातील सर्व संरक्षित वनक्षेत्र पर्यटनासाठी बंद राहतील. १८ मार्च पासून हा निर्णय लागू होईल.
 
 
 
 
राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळा सुट्टी दिल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वन विभागाने देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली आहे. याअंतर्गत राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एका परिपत्रकाव्दारे त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
राज्यातील काही व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांना देशातील विविध भागांमधून देशी व विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी/ कर्मचारी यांना सुद्धा कोरोनाच्या विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ३१ मार्च पर्यंत पर्यटन क्षेत्र बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वरील बाबी लक्षात घेऊन राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि सागरी जैव विविधता केंद्र, एरोली, नवी मुंबई व त्यातील ठाणे खाडी फ्लेमिंगो सफारी देखील १८ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत पर्यटनास बंद ठेवण्यात आल्याचे, परिपत्रकात नमूद केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@