"मोदी सरकार मुस्लीमविरोधी असेल तर इराणच्या विमानातून आले ते कोण होते?"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2020
Total Views |
Flight in Iran _1 &n
 
 


देशभरात भाजप आणि केंद्रातील सरकारला 'सीएए' आणि 'एनआरसी'च्या मुद्द्यावरून विरोधकांनी सातत्यांने मुस्लीमविरोधी म्हटले. मात्र, कोरोनाचे संकट आल्यावर इराणमधून भारतीयांना सोडवणारे आणि वुहान येथून काश्मीरी विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणणारे प्रशासन मुस्लीम विरोधी कसे, असा सवाल काही नेटीझन्सनी उठवत धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांना चपलख लगावली आहे.
 



 
 

'सबका साथ सबका विकास सबका विश्वास', या घोषणेवर काम करणाऱ्या केंद्रातील सरकारविरोधात जेव्हा प्रचार प्रसार केला जातो त्यावेळेस मुस्लीमविरोधी, हिंसाचार, मुस्लीमांना देश सोडून जाण्यासाठी प्रवृत्त करणारे सरकार, असा आरोप वारंवार धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या वृत्तींकडून केला गेला आहे. मग जर सरकार मोदीविरोधी आहे, तर इराणहून विमाने भरभरून कोणाला आणले जात आहे, हा सवाल कित्येक लोकांनी छायाचित्रे उघड झाल्यावर विचारला आहे.



 
 
 
 
भारत सरकारतर्फे इराणमध्ये अडकलेल्या २३४ नागरिकांना यशस्वीपणे भारतात आणले. हे सर्व भारतीय असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अर्थात सरकारचीच होती. ही मदत करताना कुणाला धर्म किंवा जात विचारण्यात आली नव्हती. अर्थात भारतातील कुठल्याही योजनेची अंमलबजावणी करताना कुठल्याही नागरिकाला त्याचा धर्म जात विचारली जात नाही.
 
 
 
इराणहून आलेल्या लोकांची एकच ओळख होती ती म्हणजे भारतीय... त्याच धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या वृत्तींना हेच सांगणे गरजेचे आहे, त्यापैकी बहुतांश हे मुस्लीम नागरिक होते, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आहे. शुक्रवारी १३ मार्च रोजी तिसरा जत्था भारतात पोहोचला. इराणी विमानाने त्यांना भारतात आणण्यात आले. इराणमध्ये कोरोना बाधितांचा आकडा एकूण १३ हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे या नागरिकांना परत आणणे ही प्रामुख्याने जबाबादारी सरकारची होती.
 
 
 
काही दिवसांपूर्वी वुहान येथून काश्मीरी विद्यार्थ्यांना सरकारने भारतात आणले होते. यावेळी विमानातील काही छायाचित्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद साफ झळकत होता. साऱ्यांनी इतक्या कठीण परिस्थितीत सरकारने जातीने लक्ष घालून त्यांना परत आणल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. इतकेच नव्हे तर इराणमध्ये भारतातर्फे एक मेडिकल कॅम्पचीही उभारणी करण्यात आली आहे. तिथल्या सरकारने या परदेशींची तपासणी करण्यासाठी नकार दिला होता. भारतातून पाठवण्यात आलेले हे मेडिकल कॅम्प तिथल्या भारतीयांची तपासणी करत आहे, त्याचे नमुने भारतात पाठवले जात आहेत. इराणमध्ये मृतांचा आकडा हा आता शंभरवर पोहोचला आहे. परदेशातून परतलेल्या नागरिकांनी भारतात सुटकेचा निःश्वास टाकला आहे.








@@AUTHORINFO_V1@@