मोदींची एक हाक ; शेजारील सर्व देश एकसाथ

    दिनांक  14-Mar-2020 12:28:55
|

NARENDRA MODI_1 &nbs




नवी दिल्ली
: जगभरात करोना व्हायरसने दहशत माजवली असताना सार्क (प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशिया संघटना) देशांच्या नेत्यांनी समन्वयासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. प्रत्यक्षात बैठकीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटद्वारे मांडली आणि त्याला पाकिस्तानसह सर्व नेत्यांनी एकमुखाने साथ दिली. सार्कमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.



आपण एकत्रितपणे जगासमोर उदाहरण ठेवू शकतो, सार्क देशांनी एकत्रित येऊन करोनाचा मुकाबला करण्यासाठी रणनीती ठरवावी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण देशवासीयांच्या आरोग्याबाबत चर्चा करू शकतो, असे मोदी म्हणाले. सरकार आणि जनता करोनाचा मुकाबला करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहेत, असे मोदी यांनी ट्विट केले.






इतर देशांनी पंतप्रधान मोदींच्या ट्वीटला दुजोरा दिला असताना पाकिस्तानची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नव्हती. पण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता आयशा फारुकी यांनी आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. करोनावर मात करण्यासाठी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर समन्वय गरजेचा आहे, त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्यावरील विशेष सहाय्यक या परिषदेत भाग घेतील, असे फारुकी म्हणाल्या. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी मोदी यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.