सीईओंनी बीबीसीचे निमंत्रण नाकारणे आमच्यासाठी महत्वाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |


bbc prasar bharti_1 




नवी दिल्ली : बीबीसीने दिल्ली हिंसाचाराचे एकांगी वार्तांकन केल्याप्रकरणी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शशिशेखर वेम्पती यांनी 'बीबीसी'च्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते. त्यांचे कृत्य 'प्रसार भारती'मध्ये कार्यरत पत्रकार आणि कर्मचारी यांच्यासाठी अभिमानास्पद होते, अशी भूमिका प्रसारभारतीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्या निर्णयावर टीका करणाऱ्या 'प्रसार भारती'च्या माजी सीईओंचा निषेधही करण्यात आला आहे.

 

bbc prasar bharti_1  
 
 

'नागरिकत्व सुधारणा कायद्या'विरोधात घडविण्यात आलेल्या हिंसाचाराचे अतिशय एकांगी वार्तांकन केल्याप्रकरणी 'प्रसार भारती'चे विद्यमान सीईओ शशिशेखर वेम्पती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी 'बीबीसी'च्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते. या निर्णयावर 'प्रसार भारती'चे माजी सीईओ जवाहर सरकार यांनी टीका करीत 'प्रसार भारती'चा उल्लेख 'प्रचारभारती' असा केला. त्याविरोधात 'प्रसार भारती'मध्ये काम करणारे पत्रकार आणि कर्मचारी यांनी जवाहर सरकार यांचा निषेध करणारे एक पत्रक जारी केले आहे.

 

यात दूरदर्शनचे वरिष्ठ संपादक अशोक श्रीवास्तव यांच्यासह १०० पत्रकार-कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पत्रकात म्हटले आहे की, 'बीबीसी'च्या एकांगी वार्तांकनाचा निषेध करीत देशहिताची भूमिका विद्यमान सीईओंनी घेतली होती. 'बीबीसी'ने दिल्ली हिंसाचारात मारले गेलेले कॉन्स्टेबल रतनलाल, आयबीचे अंकित शर्मा यांच्या हत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, 'प्रसार भारती'चे माजी सीईओ जवाहर सरकार यांनी देशहिताच्या आणि 'प्रसार भारती'च्या सोबत उभे राहण्याचे सोडून 'प्रसार भारती'ची संभावना 'प्रचार भारती' अशी केली. त्यांच्या या भूमिकेचा सर्व पत्रकार - कर्मचारी निषेध करीत आहोत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@