कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आणीबाणी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |
donald trump_1  




अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिका : चीन, इटलीनंतर आता कोरोना व्हायरसचे संकट अमेरिकेलासुद्धा दिवसागणिक हादरवून सोडत आहे, आतापर्यंत ११० हुन अधिक अमेरिकन्सना या जीवघेण्या संसर्गाची बाधा झाली असून यातील ४० लोकांचा मृत्यू झाला आहे, ही परिस्थिती लक्षात घेता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. अशा वेळी नॅशनल एमर्जन्सी अॅक्ट अंतर्गत आरोग्य विभागाचा अधिकाधिक बजेट हा आजार रोखण्यासाठी वापरता येणार आहे, यानुसार, तब्बल ५ हजार कोटी म्हणजेच ५० अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आल्याचे सुद्धा ट्रम्प यांनी सांगितले. व्हाईट हाऊस येथे ट्रम्प यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.


अमेरिकन माध्यमांच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणी घोषित करतानाच या व्हायरसने संक्रमित लोकांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे तसेच स्वच्छता राखणाऱ्या कामगारांचे, अधिकाऱ्यांचे सुद्धा कौतुक केले आहे. तसेच अमेरिकेतील सर्व राज्यांना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. 'वेळीस पाऊल उचलले नाही तर अमेरिकेतील १५ कोटी जनता या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकते, मात्र तसे होऊ नये म्ह्णून आपण तरतुदी करत आहोत, या काळात काही वेळेस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल पण हा किंचित त्याग आपणा सर्वांच्या हितासाठी असणार आहे, असेही टर्म यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.






दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाऱ्याच्या वेगाने होत आहे, आतापर्यंत तब्बल १ लाख ३८ हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली असून यातील मृतांचा जागतिक आकडा हा ५००० च्या घरात आहे. एकट्या चीन मध्येच या व्हायरसने ३१८० बळी घेतले होते, तर इटली मध्ये सुद्धा १००० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. भारतात सुद्धा हा आजार डोके वर काढत आहे, सध्या देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास ८५ इतकी आहे. गेल्या ३६ तासांत ७ नव्या देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे
@@AUTHORINFO_V1@@