कोरोनाचे इटलीत थैमान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |
corona italy_1  





कोरोनामुळे इटलीत एका दिवसांत २५० रुग्णांचा मृत्यू

रोम : युरोपमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असून इटलीत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील २४ तासांमध्ये इटलीत करोनाचा संसर्ग झालेल्या २५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीत एका दिवसात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आतापर्यंतची मोठी संख्या आहे.

इटलीमध्ये करोनाचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. इटलीत आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनामुळे इटलीत आतापर्यंत १२६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १७ हजारहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गुरुवार संध्याकाळपासून आतापर्यंत २५०० हून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहे.


इटलीत करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. इटलीत काही भारतीय नागरिकही अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी एक वैद्यकीय पथक भारतातून इटलीत दाखल झाले आहे. भारतीय नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भारतीयांना मायदेशी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली. दूतावासाच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना आवश्यक मदत पुरवण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@