केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ! महागाई भत्त्यात वाढ

    13-Mar-2020
Total Views |

union ministry meet_1&nbs



नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्रान ४ चार टक्क्यांची वाढ केली आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. देशासमोर उद्भवलेल्या आर्थिक आणि करोनाच्या संकटावर मात करण्याबद्दल चर्चा झाली. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली.